*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*समाधान असो चित्ती..*
समाधान असो चित्ती सांगून ते किती गेले
पाळले हो कु णी सांगा पाणी भरून ते मेले
उपदेश सोपा फार अंगिकारणे कठीण
यशासाठी करावा तो लागे फार मोठा प्रण…
चुरडून जाती पहा वळूनही पाहती ना
बुडातळी पिवळे ते पहावत नाही दैना
आज आहोत आपण पुढचा तो श्वास नाही
क्षणोक्षणी वाटतसे जगणे ते घाई घाई…
सुख पहा जवापाडे दु:ख पवर्ता एव्हढे
उन्हामुळे कळतसे सुखाची ती चव गडे
वतर्मान जगून घ्या भिवष्यात पाहू नका
असे व्हावे तसे व्हावे सततचा असे धोका..
द्वेष असूयेने झाले सांगा कोणाचे हे बरे
म्हणू नये शहाणा मी फक्त माझेच खरे
समाधान असू द्यावे शांततेत घालवा काळ
कधीच न पेटू द्यावा मन जाळणारा जाळ..
आपणही सुखात हो इतरांना सुख द्यावे
एका हाते देता मिळे दोन हाते ते स्वभावे
ऐलतीर पैलतीर डोह आनंदाचा व्हावे
सुखिवता सुखिवता आपणच सुख व्हावे..
प्रा. सौ.सुमती पवार नािशक
(९७६३६०५६४२)