You are currently viewing राखी आणि पौर्णिमा

राखी आणि पौर्णिमा

त्या राख्या काही वेगळ्याच होत्या
रंग सोडणाऱ्या रंगात रंगलेल्या होत्या
मायेचा स्पर्श तर होताच होता
थरथरणारा असला तरी हातच होता

त्या राख्या काही वेगळ्याच होत्या
स्पंजची फुले फुलवित होत्या
ओलेता स्पंज जिव्हाळा पाझरत होता
सुटलेला रंग मनगटी शोभत होता

त्या राख्या काही वेगळ्याच होत्या
झिम्माड यष्ट्या भरल्या होत्या
उभ्याने प्रवासून भावा बहिणींना
वर्षा काठी तरी भेटवित होत्या

त्या राख्या काही वेगळ्याच होत्या
पोळ्या पर्यंत मनगटी विरसत होत्या
लागला भादो अता काढ म्हटलं
तरी, त्या तुटतच नव्हत्या

ह्या राख्या काही वेगळ्याच आहेत
रंगांचे कृत्रिम रंग लेवियेल्या आहेत
अळेबळेच शुष्क हस्ते
पोस्टे धाडील्या आहेत

ह्या राख्या काही वेगळ्याच आहेत
कुपी अत्तरे शिंपडली आहेत
प्रेम सुवास हरविेली आहेत
कीमती मात्र स्पर्धा करीत आहेत

ह्या राख्या काही वेगळ्याच आहेत
भावा बहिने भेटण्या परि
डेस्टिनेशने सुट्टी घालवीत आहेत
फोटो परि राखीचे पाठवीत आहेत

ह्या राख्या काही वेगळ्याच आहेत
मावळतीला हातावेगळ्या होत आहेत
चांदी रुप्याने मढविल्या शिवाय
घट्ट हाती न ठहरत आहेत

ह्या राख्या काही वेगळ्याच आहेत
चुटकीसरशी इकडून तिकडे जात आहेत
इंटरनेटे प्रोग्रॅम देता कर्तव्ये पार पाडीत आहेत
तुटल्या नात्यांना सांधित आहेत 😥

 

राजा जोशी
२३.०८.२०२१
9823687519

प्रतिक्रिया व्यक्त करा