अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी….
जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर
सिंधुदुर्ग
सिंधुदुर्गात मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. काजूचा हंगाम अजून संपायचा होता. कोकणातल्या सर्व झाडांना चैत्र पालवी येते. तसेच काजूच्या झाडांना ही ती येते. काजूच्या झाडांना येणारी ही नवीन पालवी मोहर सुद्धा घेऊन येते या मोहरानेच मिळतात शेतकऱ्याला पाले काजू. या पाले काजूचं उत्पन्न एकूण काजूच्या उत्पन्नाच्या बारा ते पंधरा टक्के पेक्षा जास्त असते त्याशिवाय ते अत्यंत चविष्ट असतात आणि हंगामाच्या शेवटी आल्याने त्यांना रेट सुद्धा चांगला मिळतो परंतु यावर्षी काजू बागायतदारांचे अवकाळी पावसामुळे पाले काजूचे नुकसान झाल्यामुळे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
हापुस आंबा हंगाम संपत आला होता परंतु अजून 20% आंबा काढावयाचा होता याचवेळी कॅनिंगचा हंगाम जोमात असणार होता .त्याशिवाय रत्ना सिंधू गोवा मानकूर पायरी करेल आधी सर्वोत्कृष्ट आंबे मे महिन्याच्या शेवटी तयार होतात. यंदा हा सर्व आंबा अक्षरशः कुजून गेला.
कोकम चा हंगाम तर पाच-सहा मे नंतरच सुरू होतो आणि तो आठ दहा जून पर्यंत चालतो परंतु या वेळेस कोकमचे उत्पादन थोडे उशीरा होते आणि या अवकाळी पावसाने सर्व कोकम सुद्धा वाया गेले आहे. यावर्षी त्यामुळे प्रक्रिया उद्योग आणि त्यावर आधारित उद्योग यांना फार मोठा फटका बसला आहे. स्थानिक लोकांना लागणारा उत्तम दर्जाचा आमसूल यावर्षी तयारच होणार नाही तसेच कोकम आगळ कोकम सरबत बनविणाऱ्या गृह उद्योगांचा सुद्धा फार मोठा तोटा होणार आहे. त्याच बरोबर भुईमूग, मिर्ची, कलिंगड अशा अनेक पीकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या अस्मानी संकटात शासनाने तात्काळ मदत करावी अशी शेतकरी आस बाळगून आहे. तरी आपण नुकसानी संदर्भातील वस्तुनिष्ठ अहवाल शासनाला पाठवून शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई मिळवून द्यावी अशी विनंती जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे निवेदनामार्फत करण्यात आली.
जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी प्रांतिक सदस्य प्रकाश जैतापकर, जिल्हा उपाध्यक्ष विजय प्रभू, सरचिटणीस अरविंद मोंडकर, प्रवीण वरूनकर, विनायक मेस्त्री, सावंतवाडी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, कुडाळ तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, माजी जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष देवानंद लुडबे, प्रवीण मोरे, वेंगुर्ला युवक काँग्रेस अध्यक्ष प्रथमेश परब, ओरोस शहर अध्यक्ष महेश परब, व्ही.के. सावंत,बाबू गवस, सावंतवाडी सेवादल अध्यक्ष संजय लाड, सुभाष नाईक इत्यादी उपस्थित होते.
______________________________
*संवाद मीडिया*
👨⚕👩⚕👩💻👩🎓👨🎓👨⚕👩⚕👩💻👩🎓👨🎓
_*प्रवेश..प्रवेश..प्रवेश!*_
🎯 _*इंजिनिअरिंग व फार्मसी प्रवेश सुरु!*_
_सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अग्रगण्य शैक्षणिक कॅम्पस_
_भोसले नॉलेज सिटी, सावंतवाडी येथे_
https://sanwadmedia.com/171748/
_*१० वी नंतर डिप्लोमा इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु!*_
▪️ _सिव्हील इंजिनिअरिंग_
▪️ _मेकॅनिकल इंजिनिअरिंग_
▪️ _इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग_
▪️ _कॉम्प्युटर इंजिनिअरिंग_
_*१२ वी नंतर डिग्री इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु!*_
▪️ _मेकॅनिकल इंजिनिअरिंग_
▪️ _इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग_
▪️ _कॉम्प्युटर इंजिनिअरिंग_
▪️ _कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग_
_*१२ वी नंतर फार्मसीला प्रवेश सुरु!*_
▪️ _डी.फार्म_
▪️ _बी.फार्म_
▪️ _एम.फार्म_
_*यशवंतराव भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नोलॉजी*_
_MSBTE व मुंबई विद्यापीठ संलग्न आणि एनबीए मानांकित इंजिनिअरिंग कॉलेज_
_संपर्क : डिप्लोमा :9404272566_
_डिग्री :9604272566_
_*यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी*_
_MSBTE व मुंबई विद्यापीठ संलग्न आणि नॅक मान्यताप्राप्त फार्मसी कॉलेज_
_संपर्क : 8275651704, 9970832722_
🔹 _*मागास (SC, ST, NT, VJ) , इतर मागास (OBC) व खुल्या (EBC) प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय नियमाप्रमाणे फी सवलत*_
🔹 _*मुलींसाठी संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ*_
🔹 _*मुला-मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल सुविधा*_
_प्रवेशासाठी आजच संपर्क साधा._
🔘 _*आमची अधिकृत प्रवेश केंद्रे :*_
🔸 _*कुडाळ प्रवेश केंद्र :*_
_चिंतामणी प्लाझा – एस.एस.मोबाईल शेजारी_
_पोलीस स्टेशन नजीक, कुडाळ_
🔸 _*माणगाव प्रवेश केंद्र :*_
_शिवम ट्रेडर्सच्या बाजूला, माणगाव तिठा_
_माणगाव, ता.कुडाळ_
🔸 _*वेंगुर्ला प्रवेश केंद्र :*_
_हायटेक कॉम्प्युटर्सजवळ, खर्डेकर कॉलेज रोड_
_वेंगुर्ला, ता.वेंगुर्ला_
🔸 _*मळेवाड प्रवेश केंद्र :*_
_गणेश मंदिराजवळ, मळेवाड तिठा_
_मळेवाड, ता.सावंतवाडी_
🔸 _*दोडामार्ग प्रवेश केंद्र :*_
_बॉम्बे टेक्सटाईल्सच्या मागे_
_बाजारपेठ दोडामार्ग, ता.दोडामार्ग_
_*भोसले नॉलेज सिटी*_
_चराठे (वझरवाडी), ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग_
_फोन : 02363 -273535_
_www.bkcedu.com_
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/171748/
https://sanwadmedia.com/171220/
https://www.facebook.com/share/p/15Lm3JuhCr/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*