शिक्षक दिन

शिक्षक दिन

शिक्षकदिन हा भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवशी म्हणजेच ५ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे देशाचे पहिले उपराष्ट्रपती होते. त्यांचा जन्म ५ सप्टेंबर १९८८ मध्ये तमिळनाडूच्या तिरुमाली गावी झाला.
भारतासोबत इतर जगभरातील १०० पेक्षाही जास्त देशांमध्ये वेगवेगळ्या दिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो. शिक्षक दिनानिमित्त दरवर्षी शाळा आणि महाविद्यालय यांमध्ये विविध कार्यक्रम होत असतात. शिक्षक दिन हा विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचाही जीवनातला हा खास दिवस असतो. पण या वर्षी या दिनाचे शालेय आणि महाविद्यालयीन कार्यक्रम कोरोना संकटामुळे होऊ शकणार नाहीत. कोरोना च्या पार्श्वभूमीवर सध्या मुलांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण ऑनलाइन चालू आहे. यावर्षी करण्याच्या संकटामुळे सर्व शाळा आणि महाविद्यालय बंद असल्याने शिक्षक दिन ऑनलाइन साजरा केला जात असल्याचे चित्र दिसत आहे. विद्यार्थ्यांकडून शिक्षकांना शिक्षक दिनाच्या निमित्त च्या शुभेच्छा ऑनलाइनच दिल्या जात आहेत. दरवर्षी प्रमाणे शिक्षक दिन जरी साजरा केला जात नसला तरी यावर्षी या दिवसाचे स्वरुप सर्वत्र बदललेले दिसत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा