परीक्षेतील यशासाठी योग्य अभ्यासपद्धती

परीक्षेतील यशासाठी योग्य अभ्यासपद्धती

दहावी-बारावीच्या परीक्षांना आता खूपच कमी कालावधी शिल्लक आहे. प्रत्येक विद्यार्थी भरपूर गुण मिळवण्यासाठी काय करायचे याच मानसिक विवंचनेतून जात आहे. आज मी तुम्हाला यावरील सोपा उपाय सांगणार आहे आणि मला पूर्ण खात्री आहे, की जे विद्यार्थी हा उपाय अमलात आणतील त्यांचे बोर्ड परीक्षेतील गुण त्यांच्या अपेक्षेपेक्षा भरपूर वाढतील.

विद्यार्थी मित्रांनो, मला या गोष्टीची पूर्ण कल्पना आहे की तुमचे हे संपूर्ण वर्ष ऑनलाइन शिकण्यामध्येच गेलेले आहे. ऑनलाइनमध्ये तुम्ही कसे शिकलात, तुम्हाला त्यामध्ये किती अडचणी आल्या, शिकवलेला पूर्ण भाग हा समजला आहे किंवा नाही, स्वअभ्यासावर तुम्ही किती भर दिला, तुमच्या सर्व शंकांचे निरसन झाले आहे किंवा नाही, या आणि अशा अनेक अडचणींना तुम्ही सामोरे गेला आहात.

परंतु, दहावी-बारावीच्या परीक्षेतील गुणांचे महत्त्व लक्षात घेता या अडचणी आपण कायमच सांगू शकणार नाही. साधा विचार करा, की अजून दहा-बारा वर्षांनी नोकरीच्या निमित्ताने मुलाखत देताना माझ्या बोर्ड परीक्षेच्या वेळेला कोरोना प्रॉब्लेम होता, त्यामुळे मला मार्क कमी मिळाले असे तुम्ही सांगू शकणार नाही. म्हणूनच मी सांगितलेले अभ्यासपद्धती मधील बदल तुम्हाला या शेवटच्या थोड्या दिवसांमध्ये करणे आवश्यक आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा