You are currently viewing कणकवलीत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

कणकवलीत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

कणकवली :

 

आपल्याला ज्या क्षेत्रात करियर करायचे आहे, त्या क्षेत्रातील सर्व ज्ञान आत्मसात केले पाहिजे. कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर तुमचा आत्मविश्वास तुम्हाला यशाची शिखरे पादाक्रांत करण्यास उपयुक्त ठरतो, असे प्रतिपादन सीमाशुल्क विभागातील कनिष्ठ अधिकारी तथा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक सत्यवान रेडकर यांनी केले.

संकल्प प्रतिष्ठानतर्फे येथील नगरवचनालायाच्या बहुउद्देशीय सभागृहात आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनपर कार्यक्रमप्रसंगी रेडकर पुढे म्हणाले, कोकणातील मुलांमध्ये अभ्यासु वृत्ती आहे. मात्र स्पर्धा परिक्षाबाबत त्यांच्या मनात भीती असल्यामुळे ही मुळे स्पर्धा परीक्षांना सामोरे जात नाही,ही खेदाची बाब आहे.

यूपीएसीसह स्पर्धा परिक्षांची तयारी कशी करवी,अभ्यासाचे नियोजन कसे करावे,या परीक्षांचे स्वरुप कश्यप्रकरे असते याबाबत विद्यार्थ्यांना रेडकर यांनी मार्गदर्शन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 2 =