गव्याने हल्ला केल्यामुळे माडखोल येथील युवक गंभीर जखमी…
सावंतवाडी
गवा रेड्याच्या हल्ल्यात माडखोल येथील युवक गंभीर जखमी झाला आहे. आदित्य रवींद्र परब (वय १९) रा.माडखोल धुरीवाडी असे त्याचे नाव आहे. ही घटना काल रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास माडखोल येथे व्ही.पी. कॉलेज समोर घडली.
तो आपल्या घरातून सामान आणण्यासाठी आपल्या दुचाकीवरून माडखोल येथे जात होता. यावेळी माडखोल व्ही.पी. कॉलेज परिसरात असलेल्या झाडीतून भला मोठा गवा थेट रस्त्यावर आला व समोर आलेल्या आदित्याला त्याने थेट आपल्या शिंगावरून बाजूच्या गटारात फेकून दिले. यात त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. यावेळी गावातील युवक अमित राऊत, शैलेश माडखोलकर, अरविंद परब यांनी त्याला खाजगी गाडीत घेऊन अधिक उपचारासाठी सावंतवाडी कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला गोवा-बांबुळी येथे हलविण्यात आले आहे. आदित्याची घरची परिस्थिती बेताची आहे. तो कोलगाव आयटीआय मध्ये शिक्षण घेत आहे. या अपघातात त्याचा पाय जायबंदी झाला आहे. त्यामुळे वनविभागाकडून त्याला शासकीय निधी तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.