You are currently viewing चिखल उपसा करणारा “डोजर” सावंतवाडीत दाखल

चिखल उपसा करणारा “डोजर” सावंतवाडीत दाखल

मोती तलावातील गाळ काढण्याची मोहीम येत्या दोन दिवसात सुरू होणार…

सावंतवाडी

येथील मोती तलावातील गाळ काढण्यासाठी आवश्यक असलेला “डोजर’” सावंतवाडीत दाखल झाला आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात गाळ काढण्याची मोहीम सुरू करण्यात येणार आहे. याबाबत पालिका प्रशासनाकडून दुजोरा दिला.
ते म्हणाले, लोकसहभागातून ही मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक असलेली मोठी जबाबदारी आमदार दिपक केसरकर यांनी उचलली असून त्यासाठी त्यांनी “डोजर” उपलब्ध करून दिला आहे. तलावात मोठ्या प्रमाणात गाळ आहे. तो काढण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली होती. त्यानुसार ही मोहीम राबविली जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा