You are currently viewing सर्वात भारी…. लय भारी….

सर्वात भारी…. लय भारी….

आयुष्भर कमवाल पैसे तेही चांगल्या गुंतवणुकीवर, LIC ची सर्वात भारी योजना

आता तुम्ही ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही पद्धतीने खरेदी करू शकता.

LIC प्रत्येक वेळी त्यांच्या ग्राहकांसाठी खास योजना आणत असते. आताही कंपनीने अशीच योजना आणली आहे, ज्यामध्ये ग्राहकांची आयुष्यभराची चिंता मिटणार आहे. यावेळी LIC ने ‘नवीन जीवन शांती डिफर्ड अ‍ॅन्युटी’ (New Jeevan Shanti deferred annuity plan) योजना आणली आहे. कालच २१ ऑक्टोबर २०२० पासून ही योजना तुम्ही ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही पद्धतीने खरेदी करू शकता.

 

ही एक नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग, वैयक्तिक, एकल प्रीमियम, डिफर्ड अ‍ॅन्युटी प्लान आहे. LIC च्या या खास योजनेमध्ये कर्ज घेण्याचीही सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांसाठी ही अतिशय उत्तम योजना आहे. एलआयसी  ने दिलेल्या माहितीनुसार, नवीन जीवन शांती डिफर्ड अ‍ॅन्युटी योजनेसाठी वार्षिक दर हमी पॉलिसीच्या सुरूवातीसच दिली जाते.

 

या योजनेनुसार सिंगल लाइफसाठी डिफर्ड अॅन्युटीचा पहिला पर्याय देण्यात आला आहे. या पर्यायात डिफरमेंट कालावधीनंतर अॅन्युटी पेमेंट अॅन्युटी मिळवणाऱ्याला तहहयात मिळेल. जर या व्यक्तीचा दुर्देवाने मृत्यू झाला तर त्याच्या उत्तराधिकाऱ्याला त्याचा लाभ देण्यात येणार आहे.

 

कोण घेऊ शकतं जॉइंट लाइफ अॅन्युटी

 

एका कुटुंबातील केवळ दोन जणांमध्ये ही जॉइंट लाइफ अॅन्युटीमध्ये घेतली जाऊ शकते. जसं की, आजी-आजोबा, आई-बाबा, दोन मुलं, दोन नातवंड, पती-पत्नी किंवा बहिण-भाऊ यांचा समावेश असेल.

 

या योजनेला खरेदी करण्यासाठी तुम्हाला किमान १५०००० रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. अॅन्युटीला तुम्ही महिन्याकरिता, ३ महिन्याकरिता, ६ महिन्याकरिता आणि वर्षाकरिता असे पर्याय निवडू शकता. ही योजना खरेदी करण्यासाठी पर्याय निवडण्याचा अधिकार खातेधारकाराला आहे. यामध्ये किमान वार्षिक उत्पन्न १२,००० रुपये आहे. तर जास्तीत जास्त खरेदी किंमतीची मर्यादा नाही.

 

कोण घेऊ शकतात ही योजना

 

३० वर्ष ते ७९ वयोगटातील ही योजना घेऊ शकतात.

 

किती आहे डेफरमेंट कालावधी?

 

यामध्ये किमान कालावधी एक वर्ष आणि जास्तीत जास्त कालावधी १२ वर्षे असतील.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven − 3 =