You are currently viewing नागरीकांच्या सहकार्यामुळेच वेंगुर्ला पालिका स्वच्छता अभियानात जिल्ह्यात पहिली…

नागरीकांच्या सहकार्यामुळेच वेंगुर्ला पालिका स्वच्छता अभियानात जिल्ह्यात पहिली…

मुख्याधिकार्‍यांनी मानले आभार; यापुढे सातत्य ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे नागरीकांना आवाहन…

वेंगुर्ले

स्वच्छ सर्वेक्षण अभियाना अंतर्गत वेंगुर्ले नगरपरिषदेने जिल्ह्यात पहिला येण्याचा मान मिळविला आहे. तर ओडीएफ प्लस हे मानांकन सुध्दा मिळाले आहे. वेंगुर्लेतील नागरीकांनी दिलेल्या पाठबळामुळे आणि सहकार्यामुळे हे यश आम्ही मिळवू शकलो, असे मत वेेंगुर्ल्याचे मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. यापुढे यशाचे सातत्य कायम राहण्यासाठी स्वच्छता अभियानात नागरीकांनी पालिकेला सहकार्य करावे. ओला कचरा, सुका कचरा विलगीकरण करण्याबरोबर रस्त्यावर कचरा न टाकता घंटागाडीवर कचरा देवून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

वेंगुर्ला शहरास एक तारांकित मानांकन प्राप्त झाले आहे. याकरिता वेंगुर्ला शहराचे माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, उपनगराध्यक्ष शितल आंगचेकर, नगरसेवक सुहास गवंडळकर, प्रकाश डिचोलकर, प्रशांत आपटे, धर्मराज कांबळी, नागेश गावडे, विधाता सावंत, सुमन निकम, श्रेया मयेकर, साक्षी पेडणेकर, कुपा मोंडकर, अस्मिता राऊळ , कुंतीका, कुबल, तुषार सापळे, कुमा गावडे स्नेहल खोबरेकर, पूनम जाधव, दादा सोकटे, संदेश निकम, आदी नगरसेवक नगरसेविका, कार्यालयीन अधिकारी , कर्मचारी, शहरातील सर्व नागरिक यांनी सक्रिय सहभाग दर्शवला. त्यामुळे हे यश प्राप्त झाले आहे . अशा भावना मुख्याधिकारी यांनी व्यक्त केल्या आहेत. तसेच यापुढे देखील सर्व नागरिकांनी ओला कचरा, सुका कचरा, विलगीकृत स्वरूपात देऊन व रस्त्यावर कचरा न टाकता घंटागाडीवर देऊन सहकार्य करावे, शहरात होम कंपोस्टिग करून ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून कचरा कमी करायचा प्रयत्न करावा, असे आवाहन मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा