सांगुळवाडी कोव्हीड कक्षातून 2 कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीनी धूम ठोकली आहे

बाप बेट्याने सांगुळवाडी कोव्हीड कक्षातून ठोकली धुम : दोघेही कोरोना पॉझिटिव्ह.

वैभववाडी प्रतिनिधी
डॉक्टरांशी हुज्जत घालत दोन पॉझिटिव्ह व्यक्तींनी सांगुळवाडी येथील कोव्हीड कक्षातून धूम ठोकली आहे. या घटनेने आरोग्य यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडाली आहे. एडगांव येथील त्या बाप बेट्याचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले होते. दरम्यान रुग्णवाहिकेतून आरोग्य प्रशासनाने त्यांना शुक्रवारी तीन वाजता कोव्हीड कक्षात दाखल केले होते. क्वारंटाईन व्यक्तींचे स्वँब घेण्यास गेलेल्या डॉक्टरांशी त्या बाप बेट्याने हुज्जत घालण्यास सुरुवात केली. मी पॉझिटिव्ह कसा. माझा रिपोर्ट दाखवा. मी येथे थांबणार नाही असे सांगत घरचा रस्ता धरला. पायपीट करत ते घरी पोहोचले आहेत. ते दोघे जण घरी परतल्याने त्या गावात एकच गोंधळ उडाला आहे. याबाबत डॉक्टरांशी संपर्क साधला असता, दारुच्या नशेत असलेले ते दोघेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्या दोघांना परत कोव्हीड कक्षात आणणार असल्याचे सांगितले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा