You are currently viewing कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस दिनकर पाडवी नंदुरबार येथे अपघात ठार तर पत्नी गंभीर जखमी

कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस दिनकर पाडवी नंदुरबार येथे अपघात ठार तर पत्नी गंभीर जखमी

कुडाळ :

 

कुडाळ पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले व मुळचे नंदुरबारचे दिनकर जेमा पाडवी याचे आज अपघातात निधन झाले आहे. ते उपनिरीक्षक पदाची परिक्षा देण्यासाठी नाशिक येथे गेले होते. आज दिनकर पाडवी आपल्या बायको सोबत नंदुरबार येथील घरी मोटारसायकल ने बाजारात जात असताना त्यांच्या गाडीचा अपघात होऊन ते जागीच ठार झाले. तर त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या आहेत.

दिनकर जेमा पाडवी पोलिस काॅस्टेबल बक्कल नंबर ५६६ हे कुडाळ पोलिस ठाण्यात कार्यरत होते. ते दिनांक १५-४-२०२२ पासून १९-४-२०२२ पर्यंत सलग सुट्टीवर गेले होते. ही सुट्टी त्यांनी नाशिक येथे उपनिरीक्षक पदाची परीक्षा देण्याकरीता घेतली होती. परीक्षा देऊन ते आपल्या नंदुरबार येथील घरी गेले होते. आज रात्री ते व त्यांची बायको मोटारसायकल ने जात असताना वाटेत अपघाता होऊन ते जागीच ठार झाले. तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 − 9 =