You are currently viewing मोठी बातमी! भारताच्या हवाई हल्ल्यात कुख्यात दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबाचा खात्मा

मोठी बातमी! भारताच्या हवाई हल्ल्यात कुख्यात दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबाचा खात्मा

 

पहलगाम हल्ल्यातील निष्पाप पर्यटकांच्या मृत्यूला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंदूर हाती घेतले. मध्यरात्री १ च्या सुमारास सैन्य दलाने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरातील ९ दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त केली. त्यात कुख्यात दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबाचा खात्मा झाला आहे. अजहरच्या कुटुंबातील १४ लोकांना यमसदनी धाडण्यात सैन्य दलाला मोठे यश आले आहे. अजहरच्या घरावर हल्ला झाला.मात्र, मसूद जीवंत आहे की त्याचा देखील मृत्यू झाला याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

मसूद अझहरच्या भाऊ, बहिणीसह 14 जणांना मृत्यू –

पुढे आलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (POK) दहशतवादी तळांवर भारतीय हवाई दलाने हल्ला करत दहशतवाद्यांच्या तळाला लक्ष्य केलं आहे. यातील एका तळावर वास्तव्यास असलेल्या मसूद अझहरच्या कुटुंबातील 14 सदस्यांचा मृत्यू झाला असल्यावची माहिती समोर आली आहे. सोबतच या हल्यात मसूद अझहरचा भाऊ रौफ असगर हा गंभीर जखमी झाला आहे. तर ठार झालेल्यांमध्ये मसूद अझहरचा भाऊ आणि भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी रौफ असगरचा मुलगा हुजैफा यांचा देखील समावेश असल्याची माहिती पुढे आली आहे.

भारताने पाकिस्तान अधिकृत जम्मू-कश्मीरमधील मुजफ्फराबाद, कोटली, गुलपुर, बिंबर आणि सियालकोट, चक अमरू, मुरीदके, बहावलपूर अशा 9 ठिकाणी एअर स्ट्राईक केला. यापैकी काही ठिकाणे लष्कर-ए-तैयबाचे मुख्यालय, हिजबुल मुजाहिद्दीनचा तळ, दहशतवादी प्रशिक्षण केंद्र, दहशतवादी प्रक्षेपण स्थळ, सीमेवरचा दहशतीचा अड्डा असल्याची माहिती समोर येत आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर भारतात आनंद साजरा केला जात आहे. भारतीय नागरिक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करताना दिसत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा