माझे माहेर फोंडाघाट
माझे माहेर फोंडाघाट,
मला कशाचाच करायचा नाही थाट.
माझी मम्मी आहे खास,
सर्व काही करते ती थाटात खास.
या वर्षी अधिक महिन्यात आले माहेराला,
काय सांगू, अर्धा महिना गेला आनंदात आणि थाटातच सारा.
होता भाऊरायाही बरोबर,
माझा नवराही आला सोबत,
आनंदाचा सोहळाच झाला,
घरभर हसरा उत्सव रंगला.
माझे डॅडी असतात नेहमी बिझी,
तरीही त्यांनी सर्व कामांना दिली दांडी.
खरंच माझे माहेर म्हणजे पंढरी,
आणि फोंडाघाट ही माझी पवित्र नगरी.
माझे आणि आम्हा सर्वांचे मायबाप,
डॅडी आणि मम्मी आमच्यासाठी खूप खास.
नातू अर्णवही झाला खुश,
त्याचे आजी आणि अजित आबा आहेत खासच.
असेच यावेत आनंदाचे क्षण वारंवार,
हीच शुभांगी आणि अजित आबांची मनोमन प्रार्थना अपार.
अजित नाडकर्णी
शुभांजित सृष्टी

