You are currently viewing दीड दमडीची जिंदगानी

दीड दमडीची जिंदगानी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

*दीड दमडीची जिंदगानी !*

तशी बेतालच जिंदगी
सावरता आले नाही
आहे दुनिया सुंदर
रमलो इथे नाही..!

फिरली दुनिया भोवताली
वाटलं फिदा झाली
चेष्टाच तिने केली
पैशासाठी विकली गेली..!

काच तडकली जिंदगानीची
फुटली अंगावर दुनिया
स्वप्नांचे झाले उन्हाळे
जाळत सुटली दुनिया..!

आयुष्याची पडझड झाली
जगण्याचे वादळ झाले
दीड दमडीच्या जिंदगानीला
दुनियेचे देणे लागले..!

जालीम आहे दुनिया
असं कांही नव्हतचं ..
दीड दमडीच्या जिंदगानीला!
दिमाखात मिरवण्यासारखं नव्हतचं..!

भुईसपाट झालं जगणं
जिंदगानी नव्याने नटली
गुलाबांनी झाकलं मढ्याला
नवरी घोड्यावर बसली…!!!!

बाबा ठाकूर

*संवाद मीडिया*

*👮‍♂️!! खुशखबर! खुशखबर!!👮‍♂️*

*👮‍♂️भारतीय सैन्यदलात (आर्मी, नेवी, एअर फोर्स) अधिकारी होण्याची नामी संधी.*👮‍♀️

*_सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली येथे 15 दिवसांचे निवासी NDA प्रवेश परीक्षा व SSB interview मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे._*

*_🔸सदर शिबिर १ एप्रिल २०२३ ते १५ एप्रिल २०२३ या कालावधीत इ. ११वी व १२वी (विज्ञान) झालेल्या विद्यार्थ्यांकरिता आहे. सदर प्रशिक्षण शिबिर निवासी असून यामध्ये प्रामुख्याने NDA लेखी परीक्षेचे सखोल मार्गदर्शन व SSB मुलाखत प्रशिक्षण, साहसी खेळ, obstacle training, स्वयं सुरक्षा, रायफल शूटिंग व personality development तसेच सर्व प्रकारचे खेळ यांचा समावेश आहे._*

*_👇खालील लिंक वर क्लिक करून  संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा_*

https://forms.gle/xxSJxjZSbXXao8hc9

*अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा.*

*📲राजेंद्र गावडे : 9403366229*

*📲 नागेश पांढरे : 9422073840*

*📲Office : 9420195518, 7822942081*

*Advt link …👇*

*————————————–*

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 − twelve =