You are currently viewing महाराष्ट्र राज्य एस. टी.कामगार(उ.बा.ठा) सेनेत आज इतर संघटनातील पदाधिकारी तसेच कर्मचाऱ्यांचा जाहीर प्रवेश

महाराष्ट्र राज्य एस. टी.कामगार(उ.बा.ठा) सेनेत आज इतर संघटनातील पदाधिकारी तसेच कर्मचाऱ्यांचा जाहीर प्रवेश

*आबा सावंत यांची तालुकाप्रमुख तर अमित आडके यांची आगार अध्यक्षपदी निवड*

 

सावंतवाडी :

सावंतवाडी आगाराची महाराष्ट्र एसटी कामगार सेनेची आज वार्षिक सर्वसाधारण बैठक आज आदिनारायण मंगल कार्यालय येथे संपन्न झाली , सदर बैठकीसाठी आज एस.टी. कामगार सेना जिल्हाप्रमुख अनुप दयानंद नाईक, सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक श्री.बाळासाहेब गावडे,उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, शहर प्रमुख श्री शैलेश गवंडळकर, आबा सावंत जिल्हा संघटक शब्बीर मणियार उपस्थित होते. सभेमध्ये बहुमोल असे मार्गदर्शन शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक मा बाळा गावडे यांनी केले,तसेच जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत कासार साहेब आणि एसटी कामगार सेनेचे डेशिंग नेतृत्व अभ्यासू वृत्तीने कर्मचाऱ्यांची बाजू घेऊन न्याय देण्याचं काम करत कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक अडीअच्णींवर मात करणारे जिल्हा अध्यक्ष मा.अनुपजी नाईक साहेब तसेच जिल्हा सचिव आबा धुरी,विनोद ठाकुर यावेळी उपस्थित होते. सदर बैठकीत महाराष्ट्र एसटी कामगार सेना तालुका अध्यक्ष म्हणून श्री.आबा सावंत यांची निवड करण्यात आली ,तसेच आज खासदार श्री विनायक राऊत साहेब आमदार वैभवजी नाईक साहेब,जिल्हाप्रमुख श्री संजयजी पडते, तसेच महाराष्ट्र एस टी कामगार सेनेचे अध्यक्ष मा. खासदार श्री.अरविंदजी सावंत साहेब, सरचिटणीस मा.हिरेनजी रेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारणी निवड करण्यात आली,

सत्ता असताना एखादया संघटनेत प्रवेश करण वेगळं आणि सत्ता नसणाऱ्या विरोधी पक्ष्याच्या कामगार सेनेवर विश्वास ठेऊन आज इतर संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी तसेच विषेश करून आगारातील महिलांनी मोठया संख्येने कामगार सेनेत प्रवेश केला हीच शिवसेना आणि एस.टी. कामगार सेनेच्या कामाची पोचपावती आहे. सावंतवाडी आगार मधील बहुसंख्य सभासद आज उपस्थित होते,कामगार सेनेकडून विभागात पदाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांकारिता मांडलेल्या प्रश्नावर तसेच त्या प्रश्नांप्रती दिलेल्या न्यायावर विश्वास ठेऊन असंख्य एसटी कामगारांनी आज इतर संघटनातून एसटी कामगार सेनेत प्रवेश केला. यामध्ये महिला सभासद या अव्वल ठरल्या, कामगार संघटनेचे बहुसंख्य महिला वाहक तसेच इतर पदाधिकारी यांनी प्रवेश केला. वर्षीच निवड केलेले कामगार संघटनेचे पदाधिकारी यांनी आज एसटी कामगार सेनेवर विश्वास ठेऊन सभासदांनी स्वतः पावत्या घेऊन कामगार सेनेला पाठबळ दिले, आज कामगार सेनेमध्ये प्रवेश केलेल्या सर्व सभासदांचे आणि उपस्थित सर्व पदाधिकारी आणि मान्यवर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं तसेच त्वरित 2024 ची आगार कार्यकारणीची निवड करण्यात आली. एस टी कामगार सेनेच्या सावंतवाडी आगार अध्यक्ष पदी एकमताने अमित आडके तर उपाध्यक्ष पदी भगवान राऊळ आणि महिला उपाध्यक्ष निकिता चीतारी यांची बिनविरोध निवड करण्यात आली तसेच आगार सचिव पदी उल्लास चव्हाण आणि महिला सचिव पदी कोमल जोशी यांची बिनविरोध निवड करण्यात आली तसेच कार्याध्यक्ष पदी संतोष सातार्डेकर,खजिनदार पदी एम बी गावडे,आणि डी बी आडबे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.तसेच त्वरित कामगार सेनेत प्रवेश केलेल्या सर्व कर्मचाऱ्यांसहीत त्वरित कर्मचाऱ्यांचे प्रश्न घेऊन आगार व्यवस्थापकांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली आणी समस्या सोडविण्यात आल्या. अजूनही बरेच कर्मचारी कामगार सेनेत प्रवेश करण्यास इच्छुक आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा