You are currently viewing नदी समुद्र किनारी भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

नदी समुद्र किनारी भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

 

मालवण :

 

सोमवारी दिवसभर मालवण शहर परिसर व तालुक्यातील पावसाची संततधार सुरू होती. काल  सकाळपासून सुरू झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरू होता. तहसील प्रशासनाकडून तालुक्यातील सखल भागातील विशेषत नदी, खाडी, समुद्र किनारी, गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात काही दिवस मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता असल्याने पावसाचे प्रमाण विचारात घेऊन प्रवास करावा. आपत्कालीन परिस्थिती तहसील, पोलिस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

8 − 6 =