You are currently viewing श्री पंचम खेमराज महाविद्यालयामध्ये पारंपारिक दिन साजरा.

श्री पंचम खेमराज महाविद्यालयामध्ये पारंपारिक दिन साजरा.

संस्थेचे विश्वस्त युवराज लखमसावंत भोसले यांच्या हस्ते उद्घाटन.

सावंतवाडीत कलादालन सुरु करणार- युवराज लखमसावंत भोंसले

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलीत श्री पंचम खेमराज महाविद्यालयामध्ये आज पारंपारिक दिन ‘कला दर्पण’ साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत खेमसावंत भोंसले यांच्याहस्ते दिपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर युवराज्ञी सौ.श्रद्धाराजे भोंसले, संस्थेचे सहसंचालक अॅड. शामराव सावंत,सदस्य डॉ.सतीश सावंत ,श्री जयप्रकाश सावंत ,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी एल भारमल, आय क्यु ए.सी.समन्वयक डॉ. बी .एन. हिरामणी,
सांस्कृतिक कार्यक्रम समिती प्रमुख डॉ.डी.जी बोर्डे, डॉ. एस एम बुवा, प्रा.एम.ए ठाकूर ,कनिष्ठ महाविद्यालय समन्वयक प्रा.राठोड,प्रा.भिसे,प्रा.सौ.
पुनम सावंत, महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी एल भारमल यांनी केले. संस्थेचे कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत भोंसले म्हणाले की आपण सावंतवाडीत आयोजीत केलेला दशावतार महोत्सव खुप यशस्वी झाला. त्याचप्रमाणे दशावतारा सारख्या ज्या विविध कला येथे आहेत त्या कला जोपासण्यासाठी एक कलादालन सुरू करावे असा आपला विचार आहे, व आम्ही लवकरच असे कलादालन सुरू करणार आहोत , ज्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध कला जोपासल्या जातील.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. डीजी बोर्डे व डाॅ.एस.एम. बुवा यांनी केले तर आभार प्रा. एम व्ही भिसे यांनी मानले. त्यानंतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यानी विविध कलागुणांचे प्रदर्शन केले ज्यामध्ये रेकाॅर्ड डान्स,समुह नृत्य,गायन,नाटक, शास्त्रीय नृत्य असे विविध कलाविष्कार सादर केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 − 10 =