You are currently viewing हेवाळे बांबर्डे वासीय शेतकरी न्यायाच्या प्रतीक्षेत…..

हेवाळे बांबर्डे वासीय शेतकरी न्यायाच्या प्रतीक्षेत…..

दोडामार्ग

दोडामार्ग वनविभागात आर्थिक गैरव्यवहारा सोबत अवैध वृक्षतोड, वन बंधारे व हत्तीपासून संरक्षण करण्यासाठी उभारण्यात आलेल्या सौर ऊर्जा कुंपणाचे दर्जाहीन काम याला जबाबदार असणाऱ्या वनक्षेत्रपाल, वनपाल व इतर कर्मचाऱ्या विरोधात निलंबनाची कारवाई करावी या मागणीसाठी सुरू असलेले उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे.
या उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेस, अँटी करप्शन फौंडेशन ऑफ इंडिया व ह्युमन राईट्स इंटरनेशनल या अशासकीय संस्थां तसेच सेना तालुका संघटक संजय गवस, उपजिल्हाध्यक्ष गणेशप्रसाद गवस,महिला उपजिल्हाप्रमुख विनिता घाडी यांसह अनेकांनी पाठींबा दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस रुपेश जाधव व कार्यकर्त्यांनी भेट घेत पाठिंबा दर्शविला यावेळी जिल्हा अध्यक्ष अमित सामंत यांच्याशी जिल्हा सरचिटणीस रुपेश जाधव व कार्यकर्त्यांनी भेट घेत पाठिंबा दर्शविला यावेळी जिल्हा अध्यक्ष अमित सामंत यांनी भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधत मी माझ्याकडून शासन स्तरावर सर्व कामाची चौकशी करण्यासाठी प्रयत्न करतो असे स्पष्ट केले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष संदीप गवस, दोडामार्ग तालुका अध्यक्ष महादेव बोर्डेकर, शहर अध्यक्ष चांदेलकर, कार्यकर्ते सुदेश तुळसकर, अविनाश गवस, सुशांत राऊत, उल्हास नाईक आदी उपस्थित होते.

या कामांची चौकशी करायला लावून न्याय देण्याचा प्रयत्न करू : अँटी करप्शन फौंडेशन ऑफ इंडिया व ह्युमन राईट्स संस्था

दरम्यान आज तिसऱ्या दिवशी अँटी करप्शन फौंडेशन ऑफ इंडिया व ह्युमन राईट्स या अशासकीय संस्थेच्या प्रतिनिधींनी या आंदोलनाला भेट देत सदर प्रकरणी आम्ही वनाविभागाशी याबाबत चर्चा केली आहे तसेच या विभागाचे अधिकारी आंदोलनकर्त्यावर दोषी असल्याचे आरोप करत असून त्यांनी तसे पुरावे द्यावेत तसेच या प्रकरणातील संपूर्ण माहिती जाहीर करावी, अवैध वृक्षतोड तसेच सौर कुंपण काम निकृष्ट झाले आहे आणि वनबंधारे, 23 कोटी वृक्ष लागवड यांचेही पुराव्यासह स्पष्टीकरण द्यावे अन्यथा याविरुद्ध आपल्या परीने आवाज उठवण्याचा इशारा राष्टीय अँटी करप्शन फौंडेशन ऑफ इंडिया या संस्थेचे राष्ट्रीय समन्वयक प्रशांत बोर्डेकर व ह्युमन राईट्स इंटरनेशनल संस्थेच्या उपजिल्हा समन्वयक अश्विनी शिरोडकर व विनिता घाडी यांनी दिला आहे. तसेच वनाविभागातील एक कर्मचारी हा शिवसेना महिला उपजिल्हाप्रमुख विनिता घाडी यांच्यावर आर्थिक देवाण घेवणीचे आरोप करत आहे त्याचेही पुरावे द्यावेत अन्यथा उग्र आंदोलन शेडण्याचा इशारा या संस्थांकडून देण्यात आला आहे.
आंदोलनकर्त्यांनी आज फोनवरून वनमंत्री संजय राठोड यांच्याशीही संपर्क साधला असून त्यांनी आमदार खासदार यांच्याकडून याबाबतीत आपणाला पत्र द्या चौकशी करून कारवाई करू असे सांगितल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen − 15 =