You are currently viewing स्थानिक स्वराज्य संस्थांनी स्वतःच्या उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करा; आमदार नितेश राणे

स्थानिक स्वराज्य संस्थांनी स्वतःच्या उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करा; आमदार नितेश राणे

देवगड
शासनाकडून निधीची कमतरता कायम असते. स्थानिक स्वराज्य संस्थांनीही उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण केले पाहिजेत. यासाठी नवीन प्रकल्प तयार केले पाहिजेत. स्वतःचे उत्पन्न वाढविल्याशिवाय स्थिरता येणार नाही. असे मत आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केले आहे.

आमदार नितेश राणे यांनी आज प्रधानमंत्री आवास योजनेचे डेमो मॉडेल प्रकल्पाचा शुभारंभ केला. व शिवजयंती निमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धांचे बक्षीस वितरण केले. यावेळी त्यांनी उत्तम कामाबद्दल पंचायत समितीचे अभिनंदनही केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलताना त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांनी आता कोणत्याही निधीवर अवलंबून न राहता उपाययोजनांना सुरुवात करावी, अशा शब्दात मत व्यक्त केले. यावेळी सभापती रवी पाळेकर उपसभापती, रवी तिर्लोटकर, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, नगराध्यक्ष प्रियांका साळसकर व सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गटशिक्षणाधिकारी प्रजापती थोरात यांनी केले.

शिवजयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या निबंध स्पर्धा व यामध्ये निबंध स्पर्धेत गिरीश घाडी( जि. प. शाळा पुरळ कसबा) प्रथम क्रमांक, तनिष्का घुंगरेपाटील (जि. प. शाळा जामसंडे नंबर एक) द्वितीय, पियुषा कमलाकर खोत (जि. प. शाळा कातुवण) तृतीय, नेहा अमोल धुरी (जि. प. शाळा कातवन), उत्तेजनार्थ अंतरा संदेश गुरव (जि. प. शाळा फणसगाव) उत्तेजनार्थ.

यावेळी घेण्यात आलेल्या शिवगान स्पर्धेत स्नेहल गोडे (जि. प. शाळा गोवळ सोमलेवाडी) प्रथम, कल्पेश गुरव (जि. प. शाळा सौंदळे गावठाण) तृतीय निश्चय तेली (जामसंडे नंबर एक )तृतीय ,पारस कदम (जि प शाळा कुवळे नंबर 1) उत्तेजनार्थ ,स्वरांगी राघव( जि प शाळा पुरळ हुर्शी) उत्तेजनार्थ.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × one =