You are currently viewing मोरगाव श्री देव म्हाताराबाबा वर्धापनदिन सोहळा १ मे रोजी

मोरगाव श्री देव म्हाताराबाबा वर्धापनदिन सोहळा १ मे रोजी

बांदा

मोरगाव येथील श्री देव म्हाताराबाबा वर्धापनदिन सोहळा सोमवार १ मे रोजी साजरा होत आहे. त्यानिमित्त संपूर्ण दिवसभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.त्यानिमित्त सकाळी ८ वाजता श्री देवी माऊली पंचायतन देवतांचे समारंभस्थळी आगमन होईल. त्यानंतर श्री देव म्हाताराबाबा मूळ स्थानावर अभिषेक, ९ वा. श्री म्हातारबाबा मंदिर स्थानावर अभिषेक, १० वा. श्री सत्यनारायण महापूजा, १२.३० वा. महाआरती, त्यानंतर देवदर्शन व तीर्थप्रसाद, महाप्रसाद होईल.सायंकाळी ४ वाजता पावणी कार्यक्रम, ५ वा. मोरगाव व ग्रामस्थांचे भजन, ६ वा. तांबोसे येथील गुरुकृपा संगीत संस्थेचा शास्त्रीय संगीत कार्यक्रम, ७.३० वा. सांज आरती, ८ वा. पावणी कार्यक्रम, १० वा. मोरगाव ग्रामस्थ आयोजित ‘राम भक्त जांबुवंत’ हा दशावतार नाट्यप्रयोग होईल. भाविकांनी सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन श्री देव म्हाताराबाबा देवस्थान कमिटी व मोरगाव ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा