विनिता आडारकर यांना सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्कार…

विनिता आडारकर यांना सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्कार…

वेंगुर्ला

रेडीच्या मुख्याध्यापिका विनिता आडारकर यांना राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. विनिता आडारकर यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये सलग ३४ वर्ष ज्ञानदानाचे कार्य केले असून त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना ज्ञानदान केले आहे. तसेच त्यांनी गुणवत्ता, शिष्यवृत्ती, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, नवोदय विद्यालय, इतर स्पर्धा परिक्षांमध्ये विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करुन त्यांना शिष्यवृत्ती मिळवून देण्यात यश मिळविले आहे. कोरोना काळातही अलगिकरण कक्षावर सेवा बजावली आहे. या सर्व कार्याचा आढावा घेऊन गुणवंत शिक्षिका म्हणून अविष्कार फाऊंडेशन कोल्हापूर यांच्यातर्फे राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार २०२१ साठी मुख्याध्यापिका विनिता आडारकर यांची निवड करण्यात आली. पुरस्कार वितरण गणपतीपुळे येथे करण्यात आले. यावेळी प्रा. किसनराव कुराडे, अविष्कार फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय पवार, आप्पासाहेब हरमलकर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा