You are currently viewing नांदगाव सोसायटीवर शिवसेना नेते गौरीशंकर खोत यांची बिनविरोध निवड…

नांदगाव सोसायटीवर शिवसेना नेते गौरीशंकर खोत यांची बिनविरोध निवड…

कणकवली

तालुक्यातील मोठ्या नांदगाव सोसायटी निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत बळीराजा पॅनेलचे १३ संचालक निवडणूक आले होते. या सोसायटी चेअरमनपदी शिवसेना रत्नागिरी-सिंधुदुर्ग सहसंपर्कप्रमुख गौरीशंकर खोत यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर व्हाईस चेअरमनपदी अतुल सदडेकर यांची निवड वर्णी लागली आहे.

नूतन चेअरमन गौरीशंकर खोत, व्हाईस चेअरमन अतुल सदडेकर यांचे शाल, पुष्पहार घालून माजी जिल्हा परिषद सदस्य नागेश मोरये यांनी अभिनंदन केले. घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

शिवसेना नेते गौरीशंकर खोत हे या निवडणुकीत किंगमेकर ठरले होते. विजयानंतर नांदगाव सोसायटी चेअरमन पदाची जबाबदारी खोत यांनी घ्यावी अशी सभासद व शिवसेना नेत्यांचा आग्रह होता. अखेर त्यांनी लोकशाही मार्गाने होणाऱ्या निवडणुकीत नांदगाव सोसायटी चेअरमन पदाची जबाबदारी स्वीकारली आहे. या सोसायटीत अंतर्भूत तोडवली, बावशी, ओटव, सावडाव, नांदगाव, माईन अशी गावे आहेत. विकास सोसायटीचे विजय कदम, दिपक कांडर, आब्बास बटवाले, अनिल चव्हाण, प्रकाश सातवसे, महिला प्रतिनिधी मधून हसीना बटवाले, प्रभावती माळकर, तर इतर मागस प्रवर्ग गटातून शामसूंदर मोरये, भटका विमुक्त जाती मधून तात्या निकम, अनुसूचित जाती जमाती मधून धर्माजी तांबे असे १२ संचालक उपस्थित होते. तर विठोबा म्हाडेश्वेर हे आजारी असल्याने अनुउपस्थित राहिले. निवडणूक निर्णय अधिकारी कृष्णकांत धुळप यांनी काम पाहिले, यावेळी सचिव अजय गोसावी उपस्थित होते.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य नागेश मोरये, माजी चेअरमन रवींद्र तेली, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष राजेंद्र पाटील, चंद्रकांत बोभाटे, शाखा प्रमुख राजा म्हसकर, अरुण बापार्डेकर, सुनील पवार, शशिकांत तोरस्कर, सागर खोत, राबिया पाटणकर, श्रीकृष्ण घाडी, अनंत बोभाटे, हेमंत कांडर, बाळा नाडकर्णी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा