पुण्यात सिरम इन्स्टिट्यूट मध्ये भीषण आग

पुण्यात सिरम इन्स्टिट्यूट मध्ये भीषण आग

कोरोना लस निर्मितीमुळे जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या हडपसरजवळील सीरम इन्स्टिट्युटच्या मांजरी येथील प्लांटमध्ये गुरूवारी दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या घटनेनंतर अग्निशामक दलाच्या दहा गाड्या व ब्रांटो ही अद्ययावत यंत्रणा असलेली गाडी घटनास्थळी दाखल झाली आहे. आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सीरम इन्स्टिट्युटमधील “आर-बीसीजी’ लस निर्मितीकरणाऱ्या इमारतीमध्ये ही आग लागली असून कोरोनाच्या “कोवीशील्ड’ लस निर्मिती केंद्र त्यापासून दूर आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा