You are currently viewing आमदार नितेश राणे यांनी मागणी केलेली रस्ते विकासाची कामे मंजूर

आमदार नितेश राणे यांनी मागणी केलेली रस्ते विकासाची कामे मंजूर

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून आठ रस्त्यांसाठी १८ कोटी ३२ लाख रुपये

ग्रामविकास विभागामार्फत प्रशासकीय मान्यता

कणकवली

मुख्यमंत्री ग्रामसडक योजना (संशोधन व विकास) अंतर्गत भाजप नेते आमदार नितेश राणे यांच्या शिफारशीनुसार कणकवली, देवगड,वैभववाडी या तालुक्यांमध्ये १८ कोटी ३२ लाख रुपयांची रस्ते विकासाची कामे मंजूर झाली आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्त्यांच्या दर्जोन्नतीच्या कामांना ग्रामविकास विभागामार्फत ५ जुलै २०२३ रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या कामांमध्ये आमदार श्री. नितेश राणे यांच्या शिफारशीने १८ कोटी ३२ लाख रुपयांच्या २१ कि.मी. लांबीच्या ८ कामांना मंजूरी मिळाली आहे. सदर रस्ते हे अंत्यत नादुरूस्त झालेले असून वाहतुकीसाठी धोकादायक झालेले होते. या रस्त्यांच्या नुतनीकरणाची जनतेतून वारंवार मागणी होत होती. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचेकडे आमदार श्री. नितेश राणे यानी दिनांक १२ जानेवारी २०२३ च्या पत्रानुसार मागणी केली होती. त्यानुसार या कामांना मंजूरी देण्यात आली आहे. सदर रस्त्यांना मंजूरी मिळाल्याने जनतेमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
मंजूर कामे खालीलप्रमाणे ;

प्र. रा. मा. ४ ते मुंगे कारीवनेवाडी आचरा पार रस्ता या रस्त्यासाठी ३ कोटी ५६ लाख, प्रमुख जिल्हा मार्ग दहा ते मळेगाव अनुभवाने वाडी रस्ता १ कोटी ६८ लाख, नांदगाव ओटव रस्ता २ कोटी ४१ लाख, पेडगाव तांबेवाडी रस्ता २ कोटी ७० लाख, भुईबावडा एनारी भोम रस्ता २ कोटी ९१ लाख, कोकिसरे बेळेकरवाडी खांबलवाडी रस्ता १ कोटी ९९ लाख, भिरवंडे रामेश्वर मंदिर रस्ता १ कोटी २१लाख , हरकुल बुद्रुक आईतळवाडी रस्ता १ कोटी ८३ लाख अशा आठ आठ रस्त्यांसाठी १८ कोटी ३२ लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा