You are currently viewing कशास झाकायचा सूर्य दिवसा

कशास झाकायचा सूर्य दिवसा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*कशास झाकायचा सूर्य दिवसा*

 

कळू दे जगाला सर्व काही

जरी जन्मले *बाळ* आधी

पहात होत वाट मंगलाष्टकांची

ही तर होती शेवटची *संधी*

//1//

घेऊन *मांडीवरती* तुझ्या

धरला बाळाने सूर *वेगळा*

हांक मारली *आई* म्हणून

अंतरपाठ न झाला हातावेगळा

//2//

वरले होते *मनोमनी* तूज

ठेवून साक्षीला *सूर्यदेवाला*

व्यवहार होता “रोखठोकीचा”

कशास भ्यायचे जनसमुहाला

//3//

शपथ घेऊन *मंत्रोच्यारात*

नामकरण केले थाटामाटात

जरी नव्हता *चंद्र* साक्षीला

जन सागर होता *आनंदात*

//4/

कायदे कानू आंम्ही बनविले

परीस्थितीला घालून वळसा

नाते जन्मुदे *माणुसकीचे*

कशास झाकायचा सूर्य दिवसा

//5//

 

विनायक जोशी🖋️ ठाणे

मीलनध्वनी/932432415

प्रतिक्रिया व्यक्त करा