You are currently viewing श्रीगोंदवलेकरमहाराज काव्यचरितावली- काव्यपुष्प-७ वे

श्रीगोंदवलेकरमहाराज काव्यचरितावली- काव्यपुष्प-७ वे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्री.अरुण वि. देशपांडे लिखित श्री.गोंदवलेकर महाराज काव्यचरितावली*

*श्रीगोंदवलेकरमहाराज काव्यचरितावली- काव्यपुष्प-७ वे*

गोंदवल्याच्या श्रीमारुतिमंदिरी मुक्कामास
गोसावी, बैरागी, यात्री, संत नि वारकरी येती
भगवंत जाणुनी घेण्या उत्सुकतेने साऱ्यांना
श्रीमहाराज अनेक प्रश्न सहज विचारीती ।।

एक वृद्ध रामदासी म्हणाले, अरे बाळा,एक
संतभेटीसाठी चालु आहे रे माझी भ्रमंती
सद्गुरु भेटीची तळमळ या जीवा लागली
कीर्तनी ,प्रवचनी भावना हीच मी सांगितली ।।

श्रीमहाराज स्वतःच्या मनास समजाविती
घरी बसून आपणास सद्गुरू ना मिळती
श्रीमहाराज विचार पक्का अंतरी करिती
दामोदर, वामनासवे घरा बाहेर पडती ।।

लेकरे न आली घरा, शोध खुप घेतला
परतलेल्या दामोदर ने वृत्तांत कथिला
वामनासवे श्रीमहाराज असे सुखरूप
देवळात हो अंबाबाईच्या कोल्हापुराला ।।

म्हणे- कवी अरूणदास,कृपा असू द्यावी
श्रीसद्गुरुचरणी अक्षरसेवा सदा घडावी ।।
—————– ——————–
कवी अरूणदास”- अरुण वि.देशपांडे-पुणे
9850177342
—————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा

five + 3 =