You are currently viewing पर्यावरण दिन

पर्यावरण दिन

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ. कविता किरण वालावलकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*पर्यावरण दिन*

 

झाडे वाचवा वाचवा

करु वृक्षाचे रक्षण

असा संकल्प करुनी

फुलवूया सौख्यक्षण

 

झाडांमुळे सावलीचा

मिळे सर्वाना आधार

वृक्षवल्ली प्राणसखा

नको करुया प्रहार

 

जल जंगल जमीन

करु त्याचे संवर्धन

ठेवा जपू अनमोल

टिकवूया संतुलन

 

प्राणवायू आपल्याला

फक्त झाडांमुळे मिळे

गारव्याचे महत्त्व हे

वृक्षारोपणाने कळे

 

आजच निर्धार करू

दारी एक झाड लावू

वसुंधरेला फुलवून

आनंदात गीत गाऊ

 

सौ कविता किरण वालावलकर

दावणगिरी , कर्नाटक

प्रतिक्रिया व्यक्त करा