You are currently viewing पुनर्भेट

पुनर्भेट

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच…. लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्य कवी लेखक दीपक पटेकर यांची स्फुटकाव्य रचना

तू नजरेत असायचीस…
मी दूर असलो तरीही…
अधून मधून आपली, सहज भेट व्हायची..
शब्द कधी फुटलेच नाहीत….!
नेत्रांनी नेत्रांशी भेटलो…
ती बोलली असतीलही आपल्या नकळत…
प्रश्नही पडले असतील त्यांना….
जीवनातलं कोडं मात्र सुटलं नसेल…!
एकमेकांकडे पाहतो समोर आल्यावर…
ओळख असूनही अनोळखी असल्यासारखेच…!
तुझ्या एका चुकीमुळे मूक झालेल्या भावना…
कधी व्यक्तच झाल्या नाहीत…!
अगदी शेवटपर्यंत ,
तू कित्येकदा भेटलीस, पण….
तुझ्यासोबत होता तो केवळ पश्चाताप…!
डोळ्यात भाव होते ते अपराधीपणाचे…!
अभिमानाने उंचावणारी मान खाली जायची शरमेने….!
केवळ तुझ्या कर्मामुळे..
आज आपण भेटतोय.
तुझी नजर नजरेशी बोलत नाही की मान खाली जात नाही…!
आजची ही आपली पुनर्भेट…
तुझ्या निपचित पडलेल्या देहासमोर….!
प्रत्यक्षात अगदी शेवटचीच…
आठवणींमध्ये भेटत राहूच…
कधी चांगल्या,
तर कधी तू दिलेल्या घावांच्या…!!

[दीपि]
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × 4 =