You are currently viewing शिवडाव येथे महिलेची आत्महत्या

शिवडाव येथे महिलेची आत्महत्या

शिवडाव येथे महिलेची आत्महत्या

कणकवली :

शिवडाव राऊतखोलवाडी येथील दीप्ती दिवाकर कोरगावकर (६२) यांनी घरापासून जवळच असलेल्या सार्वजनिक विहिरीत आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सकाळी ११:३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. त्यांच्या आत्महत्येमागचे नेमके कारण समजू शकलेले नाही. मात्र, आजारपणाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

 

दीप्ती कोरगावकर या गुरुवारी सकाळी ७:१५ वाजण्याच्या सुमारास कोणालाही काहीही न सांगता घरातून बाहेर पडल्या होत्या. त्या घरी न परतल्याने त्यांचे पती व अन्य कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. यादरम्यान, घरापासून जवळच असलेल्या सार्वजनिक विहिरीतील पाण्यात त्यांचा मृतदेह तरंगताना दिसून आला. याबाबत पोलिसांना त्यांचे पती दिवाकर नारायण कोरगावकर यांनी माहिती दिली. तसेच मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आला. दीप्ती कोरगावकर या शासकीय सेवेतून निवृत्त झाल्या होत्या. त्यांनी कणकवली पंचायत समिती कार्यालयात सेवा बजावली होती. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा