You are currently viewing सावंतवाडी येथील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

सावंतवाडी येथील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

सावंतवाडी

येथील स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल आणि युवा रक्तदाता संघटनेच्या वतीने जागतिक रक्तदान दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात तब्बल २० रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रक्तदान शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी युवा रक्तदाता संघटनेचे देव्या सूर्याजी आणि सावंतवाडी रक्त पेढीचे कर्मचारी उज्वला वाडकर,डॉ. किरण,मानसी बागेवाडी आणि अनिल खाडे यांचे सहकार्य लाभल्याबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष रूजुल पाटणकर यांनी विशेष आभार मानले. याप्रसंगी प्रशालेचे शिक्षक कपिल कांबले, दुर्गा सरनाईक, इतर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 3 =