You are currently viewing वागदे येथे टेम्पो रिक्षा मध्ये झालेल्या अपघातात फळ व्यावसायिकाचा मृत्यू

वागदे येथे टेम्पो रिक्षा मध्ये झालेल्या अपघातात फळ व्यावसायिकाचा मृत्यू

वागदे येथे टेम्पो रिक्षा मध्ये झालेल्या अपघातात फळ व्यावसायिकाचा मृत्यू

कणकवली

कणकवली वागदे वक्रतुंड हॉटेलच्या नजीक टेम्पो रिक्षाचा अपघात होऊन एक जण ठार झाला आहे. हा अपघात शनिवारी पहाटे पाच ते सहा च्या सुमारास झाला असावा असा अंदाज व्यक्त होत आहे. हा टेम्पो रिक्षा फळे घेऊन कणकवली वरून ओरसच्या जात होता. नेमका अपघात कसा झाला हे समजू शकले नसले तरी टेम्पो पलटी होऊन दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले. यामध्ये एका फळ व्यावसायिकाचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच कणकवली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन त्याला रुग्णालयात दाखल केले.पण त्याला डॉक्टरांनी मृत्यू झाल्याचे घोषित केले. त्या फळ व्यावसायिकाच्या मृत्यूची माहिती कळताच कणकवली शहरातील बहुसंख्य फळ व्यावसायिकांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा