निलेश राणे यांची महाराष्ट्र प्रदेश सचिव म्हणून भारतीय जनता पक्षाकडून नियुक्ती…

निलेश राणे यांची महाराष्ट्र प्रदेश सचिव म्हणून भारतीय जनता पक्षाकडून नियुक्ती…

मुंबई :

नुकत्याच महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळाली. कोणत्याही पक्षाच्या चिन्हावर जरी ग्रामपंचायत निवडणुका लढवता येत नसल्या तरी प्रत्येक पॅनलचा कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाला पाठिंबा हा असतोच. याच पार्श्वभूमीवर⁹ यंदा कोकणात भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देणाऱ्या पॅनल्सचा मोठ्या प्रमाणात विजय झालेला पाहायला मिळतोय.

राज्यात शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार अस्तित्त्वात असतानाही भाजपाला जेवढा प्रतिसाद मिळाला नव्हता तेवढा प्रतीसाद यंदा ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालात मिळाला, असं विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

याबाबत बोलताना त्यांनी या विजयाचं श्रेय भाजपचे नेते निलेश राणे आणि सर्व राणे कुटुंबियांना दिलं आहे.

दरम्यान, यंदाच्या निवडणुकांच्या निकालानंतर लगेचच आता निलेश राणे यांची महाराष्ट्र प्रदेश सचिव म्हणून भारतीय जनता पक्षाकडून नियुक्ती करण्यात आली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत कोकणात भाजपला घवघवीत यश मिळाल्यानंतर राणे कुटुंबावर भाजपनं आणखी एक जबाबदारी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा