You are currently viewing मिलाग्रीस हायस्कूलमध्ये समर कॅम्पचा उद्घाटन सोहळा संपन्न…

मिलाग्रीस हायस्कूलमध्ये समर कॅम्पचा उद्घाटन सोहळा संपन्न…

मिलाग्रीस हायस्कूलमध्ये समर कॅम्पचा उद्घाटन सोहळा संपन्न…

सावंतवाडी

मिलाग्रीस हायस्कूल चे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांच्या संकल्पनेतून दि.१५ एप्रिल २०२४ रोजी सावंतवाडी येथील मिलाग्रीस हायस्कूलच्या पटांगणावर समर कॅम्पचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून फादर रोनाल्ड वाझ (असिस्टंट पॅरिस प्रिस्ट, डॉन बॉस्को चर्च) , प्रशालेच्या पर्यवेक्षिका सौ.मेघना राऊळ , श्री अमित भाटकर (क्रीडा शिक्षक – पणदूर हायस्कूल)हे उपस्थित होते. प्रशालेच्या उप मुख्याध्यापिका सिस्टर मेबल कार्व्हालो यांनी प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यानंतर प्रमुख पाहुण्यांनी या कॅम्प संदर्भात आपले मनोगत व्यक्त केले व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रशालेच्या उप मुख्याध्यापिका सिस्टर मेबल कार्व्हालो यांनीही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या कॅम्पमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या समर कॅम्प साठी जवळपास 200 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे.तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या कार्यक्रमासाठी प्रशालेच्या पटांगणावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेचे शिक्षक श्री स्वप्निल गोरे सर यांनी केले तर आभार प्रशालेच्या शिक्षिका सौ.शारदा गावडे यांनी मानले .अशाप्रकारे अतिशय उत्साही वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला.

प्रतिक्रिया व्यक्त करा