You are currently viewing रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे शासनाचे अभिनंदन…

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे शासनाचे अभिनंदन…

आंब्याचा राजा म्हणून जगभरात प्रसिद्ध सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एचडीएफसी कंपनीने दिलेल्या जाहिरातीत समावेश

सिंधुदुर्गनगरी :
आंब्याचा राजा म्हणून महाराष्ट्रात नव्हे तर जगभरात ओळख असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश एचडीएफसी कंपनीने दिलेल्या जाहिरातीत केल्यामुळे
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शाखा सिंधुदुर्गच्यावतीने आंदोलन कर्त्यांनी शासनाचे अभिनंदन केले.
आंब्याचा राजा म्हणून महाराष्ट्रात नव्हे तर जगभरात ओळख असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश १३ आक्टोबर २०२० च्या एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीमध्ये न केल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा बागायतदार यांना योजनेपासून प्रथमदर्शनी वंचित ठेवण्यात आले. यासाठी १९ आक्टोबरपर्यंत सिंधुदुर्ग जिल्हा समाविष्ट व्हावा अन्यथा समाविष्ट होईपर्यंत दिनांक २० आक्टोंबरपासून सिंधुदुर्ग नगरी ओरोस फाट्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली बेमुदत घंटानाद आंदोलन सुरू करण्यात आले. शासनाने आंदोलनाची दखल घेऊन अखेर दिनांक १४ नोव्हेंबर रोजी दुसऱ्या एका वृत्तपत्रात एचडीएफसी कंपनीने जाहिरात दिली. त्याबद्दल आंदोलनकर्त्यांनी शासनाचे अभिनंदन केले. तसेच ५ जून २०२० च्या शासन निर्णयामध्ये जे सरसकट शेतकऱ्यांचे दायित्व नाकारले त्यामध्ये दुरुस्ती करून जर शेतकरी आणि कंपनीमध्ये मतभेद झाले तर त्यातून कमीतकमी एक एकर पेक्षा कमी क्षेत्रधारक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी दायित्व शासनावर राहील. अशी हमी घेतली जावी तसा शासन निर्णय मंजूर व्हावा जेणेकरून मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी होतील. अशी विनंती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हाध्यक्ष रावजी यादव, जिल्हासचिव सुर्यकांत नाईक यांनी प्रशासनाकडे केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − four =