You are currently viewing देवगड – जामसंडे निवडणुकीकरिता भाजपच्या नऊ उमेदवारांचे अर्ज दाखल

देवगड – जामसंडे निवडणुकीकरिता भाजपच्या नऊ उमेदवारांचे अर्ज दाखल

माजी आमदार ऍड.अजित गोगटे यांच्यासह निवडणूक निरीक्षक समीर नलावडे यांची उपस्थिती

देवगड

 

जामसंडे नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता भाजप कडून आज सोमवारी 9 उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे दाखल करण्यात आले. तत्पूर्वी भाजपकडून शहरातून रॅली काढत जोरदार शक्तिप्रदर्शनही करण्यात आले.

यामध्ये प्रभाग 1 मधून स्वरा सुशील कावले,

प्रभाग 2 मध्ये धिरज गोविंद बाणे,

प्रभाग 5 मध्ये राजेंद्र श्रीधर वालकर,

प्रभाग 6 मध्ये तन्वी योगेश चांदोसकर,

प्रभाग 12 मध्ये ज्ञानेश्वर सूर्यकांत खवळे,

प्रभाग 13 मध्ये उमेश भास्कर कनेरकर,

प्रभाग 14 मध्ये अरुणा योगेश पाटकर,

प्रभाग 15 मध्ये आदया अमेय गुमस्ते,

प्रभाग 16 मध्ये शरद रामचंद्र ठुकरुल

⁰यांचे उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल करण्यात आले. यावेळी माजी आमदार ऍड. अजित गोगटे, भाजपाचे निवडणूक निरिक्षक तथा कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, जि. प. माजी सभापती सावी लोके, तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, संदीप साटम, प्रकाश राणे, बाळ खडपे, प्रियांका साळसकर, नगरसेविका मेघा गांगण आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 + two =