You are currently viewing सावंतवाडीत २७ फेब्रुवारी रोजी मोफत आरोग्य शिबिर…

सावंतवाडीत २७ फेब्रुवारी रोजी मोफत आरोग्य शिबिर…

जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, अथायु मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

सावंतवाडी

जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, अथायु मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी २७ फेब्रुवारीला काझी शहाबुद्दीन बहुउद्देशीय सभागृह, एस टी स्टँड नजीक, प्रांताधिकारी कार्यालयासमोर समोर मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० ते १.३० व सायंकाळी ३ ते ५.३० या वेळेत हे शिबिर आयोजित करण्यात आल आहे. गोरगरीब रुग्णांना विविध प्रकारचे तज्ञ डॉक्टर मोफत तपासणी करणार आहे. तर यानंतर पुढील शस्त्रक्रिया महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत होणार असून यासाठी ओरीजनल पिवळे, केशरी, अंत्योदय व अन्नपूर्णा तसेच सफेद रेशनिंग कार्ड, आधार कार्ड, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड या पैकी एक असणं आवश्यक असणार आहे.

यामध्ये मोफत ठराविक शस्त्रक्रिया, औषध, जेवण प्रवास खर्च देखील दिला जातो.‌ याचा लाभ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, तालुक्यातील गोरगरीब रुग्णांनी घ्यावा अस आवाहन जीवनरक्षा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी केल. या शिबिरात ह्रदयविकार, ह्रदयरोग, मधुमेह, छातीत धडधडण, घाम येणे, श्वास घेण्यास त्रास, हाता पायात मुंग्या येणे, वारंवार तहान लागणे, लघवी येणे आदी लक्षणे असणारे रूग्ण यात सहभागी होऊ शकतात.

हाडाच्या विकारावर डॉ. अनिल नाईक, मुत्र व किडनी विकार यावर डॉ. राहूल पाटील, कॅन्सरवर डॉ. बसवराज कडलगे, सर्जरी, गॅस्ट्रोएलॉजीवर डॉ. सौरभ गांधी तपासणी करणार आहे. या मोफत आरोग्य शिबिरात नावनोंदणी करण्याच आवाहन करण्यात आले आहे. शिबिरात मास्क, सोशल डिस्टंसिंग, कोव्हीड नियमांच पालन करण बंधनकारक राहणार आहे. रूग्णांनी येताना जुने रिपोर्ट घेऊन येण आवश्यक असणार आहे.

ज्या रूग्णांना अॉपरेशन सुचवलं आहे त्यांना मोफत बसची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या शिबिरात सहभागी होण्यासाठी नावनोंदणी करीता राजेंद्र उर्फ राजू मसुरकर – 9422435760, योगीनी सावंत – 9096553064, अथायु मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल कोल्हापूर – 9545933333 यावर संपर्क साधावा. सावंतवाडीतील रुग्णांनी प्रत्यक्ष येऊन उभाबाजार सावंतवाडी इथं जीवनरक्षा प्रतिष्ठानच्या कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seven + thirteen =