You are currently viewing नोव्हेंबर मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना वाढीव डीआर

नोव्हेंबर मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना वाढीव डीआर

 

केंद्र सरकारच्या सेवेतील आणि सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर २०१९ मध्ये घसघशीत आर्थिक लाभ होणार आहे. केंद्र सरकारच्या सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर महिन्यात वाढीव डीआर (महागाई दिलासा) मिळेल. तसेच चार महिन्याच्या थकीत डीआर देखील एकदम दिला जाईल. १ जुलै पासून डीए (महागाई भत्ता) आणि डी आर रक्कमेत वाढ करण्याचा निर्णय झाला. या निर्णयानुसार, डीए आणि डीआर २८ टक्क्यांवरून ३१ टक्के झाले. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्‍टोबर महिन्याच्या थकीत डीए आणि डीआर ३१ टक्के प्रमाणे नोव्हेंबरच्या वेतनासोबत दिला जाईल. मासिक निवृत्तीवेतन २०००० रुपये आहे, त्याला ६०० रुपयांची वाढ मिळेल. तसेच ऑफिसर ग्रेड मधील बेसिक सॅलरी ३१ हजार ५५० रुपये असणाऱ्यांना दरमहा ९४७ रुपये भत्ता मिळेल. जुलै ते ऑक्टोबरची थकीत रक्कम आणि नोव्हेंबरचा भत्ता संबंधित अधिकाऱ्याला फक्त ४ हजार ३७५ रुपये मिळतील.

प्रतिक्रिया व्यक्त करा