You are currently viewing भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयात जलदीन साजरा..

भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयात जलदीन साजरा..

महाविद्यालय व सावंतवाडी रोटरी क्लबचे आयोजन

सावंतवाडी

22 मार्च – जागतिक जल दिनाचे औचित्य साधुन रोटरी क्लब, सावंतवाडी आणि भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालय यांच्या सयुक्त विद्यमाने, विद्यालयाच्या आवारात अत्यंत साधे पद्धतीने “जागतिक जल दिन” साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना सावंतवाडी रोटरी क्लबचे अध्यक्ष रो.डॉ.राजेश नवांगुळ यानी लातुरला रेल्वेने पाणी आणण्याचा प्रसंगाची आठवण करुन दिली. भारतातील चेनैई आणि दक्षिण अफ्रिकेतील जोहन्सबर्ग ही महानगरे पाण्याअभावी ओस पडण्याची वेळ आली होती याचे स्मरण करुन दिले. यासाठी पाण्याचे महत्व ओळखा, पाणी जे आपण निर्माण करु शकत नाही परंतु अनाठायी वृक्ष तोड थांबवून त्याचे संवर्धन करुन नविन वृक्ष लावणे आपल्या हाती आहे. त्यासाठी प्रत्येकानी आपल्या प्रियजनांच्या वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस प्रसंगी तसेच प्रियजनांच्या आठवणी साठी किमान एक रोप लाऊन ते वाढवावेत आणि येणाऱ्या भावी पिढीला हिरवीगार निसर्गा बरोवर शुद्ध हवा आणि विपुल पाण्याची भेट द्यावी असे आवाहन त्यानी केला. याप्रसंगी पाणी वाचविण्यासाठी “जल-शपथ” घेतली.

यावेळी आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. बाबासाहेब पाटील यानी रोटरी क्लब, सावंतवाडीच्या या कार्याची प्रशंसा केली आणि रोटरीच्या समाजोपयोगी कार्यक्रमात आयुर्वेद महाविद्यालय सहभाग नेहमी असेल याची ग्वाही दिली. यावेळी आयुर्वेदात महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी अल्पावधीत सुंदर पोस्टर्स तयार करुन जागतिक जल दिनाचे महत्त्व अधोरेखीत केले. रोटरी सचिव रो.दिलीप म्हापसेकर यानी आभार प्रदर्शनाच्या आपल्या भाषणात भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालय देत असलेल्या सहकार्याची प्रशंसा केली आणि आभार मानले.

पाणी आणि रक्त या अशा दोन गोष्टी अशा आहेत की ज्या मानव निर्माण करु शकत नाही. तेव्हा पाण्याचा वापर जपुन करणे आणि पुनरवापर करणे या सध्यस्थितीत आपल्या समोर पर्याय असल्याचे त्यानी सांगितले. त्यानी महाविद्यालयाच्या प्रशासन आणि प्राचार्य डॉ.बाबासाहेब पाटील, रो.श्रीराम गावडे,उपस्थित प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी-विद्यार्थीनीचे आभार मानले.

उद्या 23 मार्च हा जागतिक हवामान दिन असल्याने रोटरी क्लब, सावंतवाडीचे अध्यक्ष-रो.डॉ.राजेश नवांगुळ यानी “तुळशी” पासुन आपल्याला मुबलक प्रमाणात प्राणवायु मिळत असल्याने उद्या “तुळशीचे” किमान एक “नवे रोपटे” लावुन त्यासोबत सेल्फी काढून 8550975242 या Whats-app नंबरवर पाठवावी असे आवाहन केले. सर्व सेल्फीना एक प्रशस्तीपत्र देण्याचे रोटरी अध्यक्ष रो.डॉ.राजेश नवांगुळ सांगितले. त्याच प्रमाणे उद्या “जागतिक हवामान दिन” वातावरणात कार्बन वायु कमी करण्यासाठी उद्या 23 मार्च रोजी दिवसभर पेट्रोल-डिझेल वाहने “न चालविण्याचा” संकल्प करुन त्या ऐवजी चालत किवा सायकल किवा विजे वरील वाहनानी दैनंदिन व्यवहार करण्याचे आवाहन या निमित्याने सावंतवाडीकराना केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen − four =