कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे वैभववाडी पंचायत समितीचे निर्जंतुकीकरण…..

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे वैभववाडी पंचायत समितीचे निर्जंतुकीकरण…..

पंचायत समितीच्या यापुढील सभा आँनलाईन – सभापती अक्षता डाफळे…..

पंचायत समिती कार्यालयात कोरोनाचा रुग्ण सापडल्यामुळे तालुक्यात खळबळ माजली होती. कर्मचारीही भयभीत झाले होते. या सर्वांना सभापती अक्षता डाफळे यांनी धीर दिला आहे. सभापती यांनी आज संपूर्ण पंचायत समिती कार्यालयात निर्जंतुकीकरण करून घेतले. तसेच पाँझीटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या कर्मचाऱ्यांना स्वँब टेस्ट करून घेण्याच्या सुचना संबधिताना त्यांनी दिल्या.तसेच खबरदारी म्हणून कार्यालयामध्ये सामाजिक अंतर राखून कामकाज चालविण्याच्या सुचना गटविकास अधिका-यांना दिल्या. तसेच एक दिवस आड कर्मचारी उपस्थित राहण्याबाबतही त्यांना सुचविले. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सभापती यांनी सांगितले. कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी घाबरून जाऊ नये अस आवाहन केले आहे. तसेच पंचायत समितीच्या यापुढील सभाही आँनलाईन होणार असल्याचे सभापती डाफळे यांनी सांगितले. नागरिकांनी महत्त्वाच्या कामासाठीच घराबाहेर पडा.स्वतः सहीत इतरांची काळजी घ्या. मास्क व सँनिटायझर याचा वापर करावा अस आवाहन सभापती यांनी नागरिकांना केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा