मच्छी मार्केट क्राऊन बेकरी कॉर्नर व इको बँक कॉर्नर येथील ते तीन खड्डे जीवघेणे ठरणार?- रवी जाधव
सावंतवाडी
सावंतवाडी मच्छी मार्केट येथील क्राऊन बेकरी कॉर्नर व इको बँक कॉर्नर या ठिकाणी रस्त्यावरून पडलेले तीन खड्डे जनतेच्या जीवास धोका निर्माण करणारे आहेत दोन दिवसापूर्वी सदर खड्ड्यामध्ये एक वृद्ध पडून गंभीर जखमी झाला तर हा तिसरा अपघात आहे असे तेथील नागरिकांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना सांगितले तसेच नेहमी ये जा करणाऱ्या स्लॅप वर पडलेल्या खड्ड्यातून जीव गुदमरणारा गॅस बाहेर पडत आहे त्यामुळे तेथील नागरिक व व्यापारी सदरच्या खड्ड्यातून निघणाऱ्या दुर्गंधीयुक्त गॅसमुळे त्रस्त झालेले आहेत.
कित्येक वेळा नगरपालिकेला कळून सुद्धा सदर खड्ड्यांबाबत अद्यापही नगरपालिकेकडून कार्यवाही झाली नाही त्यामुळे सामाजिक बांधिलकीची मदत घ्यावी लागत आहे असे तेथील नागरिकांनी सांगितले.
तरी सावंतवाडी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी सदर विषयाचे गांभीर्य घेऊन कोणाच्याही जीवास धोका निर्माण होऊ नये यासाठी सदर खड्ड्यांबाबत तत्काळ कारवाई करण्याची मागणी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.