You are currently viewing स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये ‘आषाढी एकादशी’ आणि ‘ईद- उल – अधा’ हे सण मोठ्या जल्लोषात साजरे

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये ‘आषाढी एकादशी’ आणि ‘ईद- उल – अधा’ हे सण मोठ्या जल्लोषात साजरे

सावंतवाडी

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये ‘आषाढी एकादशी’ आणि ‘ईद- उल – अधा’ हे सण मोठ्या जल्लोषात साजरे केले गेले.’ सर्वधर्म समभाव’ ही भावना जोपासणारे दोन्ही सण एकाच दिवशी साजरे केल्यामुळे शाळेतील सर्वच विद्यार्थी अतिशय उत्साहाने या कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले. आषाढी एकादशी कार्यक्रमाच्या निमित्ताने इयत्ता १ ली मधील सर्व विद्यार्थ्यांनी रंगीत वेशभूषा परिधान केली. या विद्यार्थ्यांमध्ये ‘विवान पंढुरकर’ याने विठ्ठलाचा तर ‘ आद्या कुंभार ‘ हिने रखुमाईचा वेश परिधान केला. वारकरी संप्रदायाची भूमिका सादर करताना विद्यार्थ्यांनी ‘ विठ्ठल – विठ्ठल ‘ असा पांडुरंगाच्या नामाचा जयघोष करीत वारी काढली आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली. तसेच सर्व विद्यार्थ्यांनी मिळून विठ्ठलाची आरती व पसायदान म्हटले. आषाढी एकादशीचा हा कार्यक्रम ‘ कब – बुलबुल ‘ अंतर्गत आयोजित करण्यात आला. कब – बुलबुलच्या सौ. सुषमा पालव व कु. विनायकी जबडे या सह. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कार्यक्रम संबंधी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन दिले.
याच दिवशी ‘ईद- उल- अधा’ म्हणजेच ‘बकरी ईद’ हा देखील सण मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. या कार्यक्रमामध्ये अस्मी प्रभू तेंडोलकर, स्पृहा आरोंदेकर, तनिष्क पवार, रोनक पवार व अगस्त्य तानपुरे या इयत्ता ५ वी च्या विद्यार्थ्यांनी ‘बकरी ईद’ या सणावर आधारित भाषण केले. त्यांच्या भाषणाच्या माध्यमाद्वारे ‘ईद – उल – अधा ‘ हा सण का साजरा केला जातो? व त्या मागचे कारण काय? याची माहिती देण्यात आली. तर या सणाला अनुसरून एक छोटेसे नाट्य विद्यार्थ्यानी सादर केले. त्यामध्ये इयत्ता ५ वी मधील ‘वैष्णव सावंत’ याने हजरत इब्राहिम , व इयत्ता ३ ली मधील हजरत इब्राहिमच्या मुलाची भूमिका ‘ नुमान नदाफ ‘ , अल्लाहकडून फर्मान घेऊन येणाऱ्या व्यक्तीची भूमिका ‘ रणवीत रांजणे’ तर हजरत इब्राहिमच्या कुटुंबातील सदस्या म्हणून ‘आराध्या खोराटे’ व इयत्ता १ ली मधील ‘ हुरेन मेमन’ या विद्यार्थ्यांनी भूमिका पार पडल्या. विद्यार्थ्यांनी केलेल्या या भूमिकेद्वारे एकता व समानता, त्याग, माणुसकी हाच खरा धर्म आहे हा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला. स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमधील सह. शिक्षिका सौ. जरीन शेख व सौ. नफिसा शेख यांनी या कार्यक्रमासंदर्भात सर्व विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन दिले.
‘आषाढी एकादशी’ व ‘ ईद – उल – अध ‘ हे दोन्ही कार्यक्रम एकाच दिवशी साजरे करण्याच्या मागचा उद्देश विद्यार्थ्यांना समजवण्यात आला. कोणत्याही प्रकारच्या जाती, धर्म यामध्ये भेदभाव न बाळगता प्रत्येकाने एकमेकांशी बंधुत्वाच्या, आपुलकीच्या व प्रेमाच्या नात्याने वागले पाहिजे ही शिकवण या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना देण्यात आली. इयत्ता १ ली ते ५ वी च्या सर्वच विद्यार्थ्यांनी या दोन्ही कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. दिशा कामत व शाळेचे संस्थापक श्री. रुजुल पाटणकर यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या कार्यक्रमांमध्ये शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थ्यांनी आनंदाने सहभाग घेतला व कार्यक्रमाची शोभा वाढवली. अशाप्रकारे स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल मध्ये दोन्ही सण मोठ्या जल्लोषात साजरे केले गेले.

प्रतिक्रिया व्यक्त करा