You are currently viewing 1 लाख 49 हजारांच्या अवैध दारुसह 3 लाख 49 हजार 920 रुपयांचा मुद्देमाल जप्त ; महिलेसह दोन आरोपींवर गुन्हा दाखल

1 लाख 49 हजारांच्या अवैध दारुसह 3 लाख 49 हजार 920 रुपयांचा मुद्देमाल जप्त ; महिलेसह दोन आरोपींवर गुन्हा दाखल

1 लाख 49 हजारांच्या अवैध दारुसह 3 लाख 49 हजार 920 रुपयांचा मुद्देमाल जप्त ; महिलेसह दोन आरोपींवर गुन्हा दाखल

दोडामार्ग पोलीस इलेक्शन पार्श्वभूमीवर अत्यंत अलर्ट मोडवर ; पोलीस निरीक्षक ओतारी यांच्या टीमची सातत्यपूर्ण कामगिरी

दोडामार्ग

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोडामार्ग पोलीस अत्यंत अलर्ट मोडवर असून पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या नेतृत्वाखाली दोडामार्ग पोलिसांनी आठवड्याभरात दुसऱ्यांदा गोवा बनावटीची अवैध दारू पकडली आहे. 30 मार्च रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास वझरे गावठणवाडी येथे ही कारवाई करण्यात आली. आरोपी दीपाली शिरसाट हिच्या घरी विक्री च्या उद्देशाने प्रताप कळंगुटकर याने मारुती ओमनी कार मधून गोवा बनावटीची अवैध दारू आणली होती. पोलीस निरीक्षक ओतारी याना याची माहिती मिळताच एसपी अग्रवाल, अतिरिक्त एसपी कृषिकेश रावले यांच्या सूचनेनुसार डीवायएसपी श्रीमती गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय निसर्ग ओतारी,ए एस आय गवस, हवालदार माळगावकर, कॉन्स्टेबल समीर सुतार, महिला पोलीस कॉन्स्टेबल नाईक, होमगार्ड झोरे यांच्या पथकाने घटनास्थळी छापा टाकला. छाप्यात गोवा बनावटीच्या व्हिस्की आजी बिअर असा एकूण 1 लाख 49 हजार 920 रुपयांचा दारूसाठा आणि 2 लाख रुपये किंमतीची मारुती ओमनी कार असा 3 लाख 49 हजार 920 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या गुन्ह्यात गोवा राज्यातील प्रताप महादेव कळंगुटकर ( वय 62, रा.बाये, सुर्ला, नॉर्थ गोवा ) याच्यासह दीपाली देवानंद शिरसाट ( वय 56 वर्षे, रा. वझरे, गावठनवाडी, ता. दोडामार्ग ) या दोंघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भगत करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा