You are currently viewing सावंतवाडी नगरपरिषदे वरील भोंगा बंद करण्याची मागणी

सावंतवाडी नगरपरिषदे वरील भोंगा बंद करण्याची मागणी

भोंगा बंद आंदोलनाचे निमित्त साधून धुकटात पेट

कर्कश आवाजामुळे काळानुसार बदल अपेक्षित

सावंतवाडी नगर परिषदेत गेली अनेक वर्षे सकाळी ६.०० वा. दुपारी १२.००व रात्री ९.०० वाजता असा तीन वेळा भोंगा होतो. शहरातील अनेक जण या भोंग्याच्या आवाजा नंतरच जागे होतात…. अनेक जण एक वेळ जरी भोंगा वाजला नाही तरी ते याची चौकशी करत असतात. कित्येकांचा दिवस पहाटे ६.०० वाजताच्या भोंग्याने सुरू होतो रात्री ९.०० वा.च्या भोंग्यावरच संपतो. सावंतवाडी नगरपरिषद इमारतीवरील घड्याळ हे सावंतवाडी नगर परिषदेची आणि शहराची शान आहे. त्याचबरोबर गेली कित्येक वर्षे शहराचे एक वेगळेपण जपत नगरपरिषदेतर्फे दिवसातून तीन वेळा भोंगा वाजविला जात आहे.


जसजसा शहराचा विकास होत गेला तसतसे बाजारपेठेच्या आजूबाजूची जुनी घरे पाडून त्या ठिकाणी भल्या मोठ्या इमारती उभ्या राहिल्या. शहराच्या गजबजाटापासून दूर असणारी अनेक कुटुंबे बाजारपेठेत घर असावे या हव्यासापोटी… अट्टाहासापोटी बाजारपेठेतील संकुलांमध्ये महागडे घर घेऊन राहू लागले. अशा अनेक कुटुंबांना जी पूर्वी शहराच्या बाहेर राहत होती त्यांना शहरात होत असलेल्या भोंग्याचा आवाज कदाचित ऐकू जात नव्हता, परंतु नगरपरिषदेच्या आजूबाजूला बाजारपेठेत घर घेतल्या कारणाने कित्येक वर्षे वाजणाऱ्या भोंग्याचा त्रास त्यांना होऊ लागला. मनसेच्या मशिदीवरील भोंगा बंद आंदोलनाचे निमित्त साधून “धुकटात पेट” मारून घ्यायचा या म्हणीप्रमाणे संकुलातील काही लोकांनी सावंतवाडी नगरपालिकेवर वाजणारा भोंगा त्याच्या कर्णकर्कश्श आवाजाचा त्रास होत असल्याने बंद करावा अशी मागणी केली आहे. जग डिजिटल झाले आहे त्याच प्रमाणे सर्व काही डिजिटल होत असून काळानुसार बदल अपेक्षित आहे, असे त्यांची त्यांचे म्हणणे आहे. भोंग्याच्या होत असलेला कर्णकर्कश आवाजामुळे संकुलातील नागरिक त्रस्त झाले आहेत असेही कारण त्यांनी भोंगा बंद करण्याच्या मागणी बरोबर दिलेले आहे.
काळ बदलतो तसा मानव आपल्या सवयी बदलत आहे. अगदी जुन्या काळात देखील झाडपाल्याची औषधे घेणारे लोकसुद्धा शंभर वर्षे जगत होते. ठणठणीत आणि निरोगी आरोग्य आयुष्य जुन्या काळातील व्यक्तींना लाभत होते. परंतु गेल्या काही वर्षांपासून आलेल्या काही ऍलोपॅथिक औषधांमुळे माणसाचे आरोग्य सुधारण्यापेक्षा धोक्यात झालेले आहे. त्यामुळे काही ऍलोपॅथिक औषधाचे भोगावे लागणारे दुष्परिणाम पाहता पुन्हा एकदा लोक आयुर्वेदिक औषधांकडे वळू लागले आहेत. म्हणजेच जग कितीही डिजिटल झालं कितीही सुधारलं तरी पुन्हा एकदा झाडपाल्याच्या औषधांवर विश्वास दाखविण्याची पाळी लोकांवर आलेली आहे. म्हणजेच “जुने ते सोने” म्हणण्याची वेळ पुन्हा एकदा आलेली आहे. आणि हीच परिस्थिती सावंतवाडी शहरातील जुन्या काळापासून सुरू असलेल्या भोंगा बंद करण्याची मागणी करणाऱ्यांवर भविष्यात येईल आणि ते सुद्धा पुन्हा एकदा शहराची शान असलेले भोंगे सुरू करण्यासाठी धडपड करतील.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 3 =