वेंगुर्ले-अणसुर रस्त्याची दयनीय अवस्था…

वेंगुर्ले-अणसुर रस्त्याची दयनीय अवस्था…

ग्रामस्थांनी घेतली आ.नितेश राणेंची भेट

वेंगुर्ला
अणसूर घाटी माथा ते अणसूर नाका ( ग्रा. मा. क्र. १२५ ) ह्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून याचा वाहन चालक, स्थानिक ग्रामस्थ यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. हा रस्ता जि. परिषद अंतर्गत येत असून ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायत अणसूर यांच्यामार्फत वारंवार संबंधित विभागास संपर्क करूनही गेली ५ ते ६ वर्षे या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी अधिकारी व संबधीत विभागाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे यामुळे अणसूर व पाल येथील ग्रामस्थांच्या शिष्टमंडळे याबाबत नितेश राणे यांची भेट घेतली व रस्त्याबाबत निवेदन दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा