सावंतवाडी नरकासुर स्पर्धेचा निकाल जाहीर…

सावंतवाडी नरकासुर स्पर्धेचा निकाल जाहीर…

खुल्या गटात प्रथम क्रमांक हनुमान बाळ गोपाळ मित्र मंडळ, माठेवाडा तर बाल गटात प्रथम क्रमांक भटवाडी मित्र मंडळ यांनी मारली बाजी

सावंतवाडी
येथे भाजप शहर मंडल तर्फे आयोजित नरकासुर स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या स्पर्धेत खुल्या गटात माठेवाडा येथील हनुमान बाल गोपाळ मित्र मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर द्वितीय क्रमांक विभागून अनुक्रमे झकास मित्रमंडळ वैश्यवाडा आणि आत्मेश्र्वर युवक मित्र मंडळ माठेवाडा यांनी पटकावला आहे.

तर तृतीय क्रमांक देखील विभागून देण्यात आला असून, रॉयल गृप चितारआळी आणि वैश्यवाडा मित्र मंडळ, मारुती मंदिर जवळ यांनी प्राप्त केला आहे. तर खुल्या गटात उत्तेजनार्थ पारितोषिक सालईवाडा मित्रमंडळ मिलग्रिस हायस्कूल जवळ आणि नरसोबा मित्र मंडळ जूनाबजार यांनी प्राप्त केला आहे. तर बाल गटात भटवाडी मित्र मंडळ दत्त मंदिर यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तर द्वितीय क्रमांक विभागून देण्यात आला असून श्री देव महापुरुष मित्र मंडळ गोठण आणि झपाटा मित्र मंडळ सबनीसवाडा यांनी प्राप्त केला आहे.

तर तृतीय क्रमांक देखील विभागून देण्यात आला असून प्रज्वल मित्र मंडळ आणि समाज मंदिर बाल मित्र मंडळ यांनी प्राप्त केला आहे. तर उत्तेजनार्थ पारितोषिक मोरया ग्रुप जिमखान, साई कला क्रीडा मंडळ गावडे शेत आणि शिरोडा नाका मित्र मंडळ यांनी प्राप्त केला आहे. ही स्पर्धा भाजप शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली होती. कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक ठिकाणी जाऊन या सहभागी नरकासुराच्या प्रतिमेचे परीक्षण करण्यात आले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा