You are currently viewing नांदगाव पंचक्रोशीतील थकीत विज कन्केशन न तोडता बिले हप्त्यात घ्या…

नांदगाव पंचक्रोशीतील थकीत विज कन्केशन न तोडता बिले हप्त्यात घ्या…

शिवसेना शिष्टमंडळाचे निवेदन

कणकवली

नांदगाव पंचक्रोशीतील थकीत विज ग्राहक घरगुती वा व्यावसाईक यांचे विज कन्केशन न तोडता बिले हप्त्यात घ्यावी अशा सुचना पालकमंत्री यांनी केलेल्या पार्श्वभूमीवर आज विज वितरण कंपनी नांदगाव च्या अभियंत्यांना याबाबत नांदगाव शिवसेना शाखाप्रमुख राजा म्हसकर व शिवसेना शिष्टमंडळाने निवेदन सादर केले आहे.

ते निवेदनात म्हणतात की, आम्ही नांदगाव पंचक्रोशी विज ग्राहक आपल्याला असे सांगू इच्छीत आहोत की, गेले वर्ष भरापासून कोरोनाच्या लॉकडाउन मुळे सर्व शेतकरी वीज ग्राहक हैराण झाले आहेत. त्यात आता मार्च एंड आल्याने आपण बिले वसुलीसाठी लागला आहात. बिले वसूल करताना पालकमंत्री उदयजी सामंत यांनी सुचना केल्याप्रमाणे हप्त्याने घ्या व विज ग्राहक मग तो घरगुती व व्यवसायीक असला तरी त्यांचे कन्केशन तोडण्यात येवू नये.  तसे प्रकार घडल्यास आम्ही गप्प बसणार नाही तरी सर्व विज ग्राहकांना बिले हप्त्यात घेवून सहकार्य करावे अशा आशयाचे निवेदन देण्यात आले.

यावेळी युवा सेना उपतालूका प्रमुख आबू मेस्त्री, नांदगाव शाखाप्रमुख हनुमंत ऊर्फ राजा म्हसकर, तोंडवली शाखा प्रमुख सुनिल पवार, तात्या निकम, रज्जाक बटवाले, विनायक कांदळकर, महीला विभाग प्रमुख सारिका खरात, शोभा खरात आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थीत होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen + five =