You are currently viewing लखीमपूर खेरीतील हिंसाचाराचा कणकवलीत केला निषेध

लखीमपूर खेरीतील हिंसाचाराचा कणकवलीत केला निषेध

शेतकरी आंदोलनास पाठिंबा दर्शविणार्‍या घोषणांनी परिसर सोडला दणाणून, प्रांताधिकारी यांना दिले निवेदन

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे घडलेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ,काँग्रेस पक्षाच्या नेतेमंडळीसह , शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आणि शिवराज्य ब्रिगेडसह सामाजिक संघटनांच्या सदस्यांनी निषेध केला. हिंसाचारास जबाबदार असलेल्या मंत्रीपुत्रावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्याला तात्काळ अटक करावी. तसेच त्याच्यावर कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांना देऊन केंद्र सरकारपर्यंत आमच्या मागणीचे निवेदन पोहोचवावे, अशी विनंती त्यांनी केली.

यावेळी शिवसेना नेते संदेश पारकर, कॉंग्रेस तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, काँग्रेस शहर अध्यक्ष महेश तेली, काँग्रेस जिल्हा सरचिटणीस महेंद्र सावंत , कणकवली तालुका सरचिटणीस प्रवीण वरूनकर, युवक तालुका अध्यक्ष निलेश तेली , शिवसेनेचेउपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, माजी जि.प.सदस्य संदेश सावंत-पटेल, भास्कर राणे, अ‍ॅड. हर्षद गावडे, कलमठ ग्रामपंचायतीचे सदस्य विनायक उर्फ बाळू मेस्त्री, अभिनेते नीलेश पवार, शिवराज्य ब्रिगेडचे सुनील पारकर, संजय राणे, विनायक सापळे, राजू कासले, प्रदीपकुमार जाधव, राजेंद्र सावंत, सत्यजित पारकर, अमेय पारकर, जय शेट्ये, सुनील हरमलकर, प्रणय केळुसकर, परेश सावंत, महेश कोदे, दीपक गुरव, मारुती सावंत, सदानंद सावंत, गणेश राणे, आप्पा चिंदरकर, निसार शेख आदी उपस्थित होते. प्रांताधिकार्‍यांना निवेदन सादर करण्यापूर्वी उपस्थितांनी शेतकरी आंदोलनास पाठिंबा दर्शविणार्‍या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.

प्रतिक्रिया व्यक्त करा