You are currently viewing सावंतवाडीतील “त्या” गतिरोधकावर पांढरे पट्टे मारणार…

सावंतवाडीतील “त्या” गतिरोधकावर पांढरे पट्टे मारणार…

सावंतवाडीतील “त्या” गतिरोधकावर पांढरे पट्टे मारणार…

सावंतवाडी

शहरातील जुन्या मुंबई-गोवा महामार्गावर घालण्यात आलेले त्या धोकादायक (रम्बलर स्ट्रीप) गतिरोधकाच्या ठीकाणी येत्या आठ दिवसात पांढरे पट्टे मारले जाणार आहेत. तशा प्रकारचा सकारात्मक निर्णय बांधकाम विभागाकडून आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. याबाबत माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी पाठपुरावा केला होता. तसेच आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. आज झालेल्या चर्चेत हा सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे.
याबाबत बांधकाम अधिकारी वैभव सगरे यांच्या सोबत बैठक घेण्यात आली. यावेळी सुधीर पराडकर, बावतीस फर्नांडिस, सत्यजित देशमुख, दीपक सावंत, हर्षवर्धन धारणकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा