You are currently viewing माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विकास कुडाळकर यांचा भाजपात प्रवेश

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विकास कुडाळकर यांचा भाजपात प्रवेश

कुडाळ :

 

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विकास कुडाळकर यांनी कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी तथा माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात प्रवेश करून ते स्वगृही परतले. यावेळी माजी खासदार निलेश राणे यांनी सांगितले की माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विकास कुडाळकर हे आमच्या राणे कुटुंबीयांचा एक भाग होते काही काळ ते आमच्यापासून विभक्त झाले होते पण ते आमचे आहेत आमचे राहणार आहेत त्यांचा योग्य तो सन्मान पक्षात केला जाईल असे सांगितले तसेच यावेळी माजी तंटामुक्ती अध्यक्ष विष्णू धुरी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला या प्रवेशामुळे पिंगुळी सहपंचक्रोशीतील गावांमधील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला भगदाड पडले आहे.

भाजप पिंगुळी कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्ताने विकास कुडाळकरसह माजी तंटामुक्ती समिती अध्यक्ष विष्णू धुरी व कार्यकर्ते यांचा प्रवेश कार्यक्रम पक्षाचे नेते दत्ता सामंत, सरपंच अजय आकेरकर, प्रदिप माने यांच्या माध्यमातून माजी खासदार नीलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पिंगुळी येथील भवानी मंगल येथे झाला यावेळी भाजप नेते दत्ता सामंत, तालुका अध्यक्ष दादा साईल, कुडाळ तालुका अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजू परब, बंड्या सावंत, आनंद शिरवलकर, अँड बंड्या मांडकुलकर, मोहन सावंत, विनायक राणे, सरपंच अजय आकेरकर, प्रदिप माने, मोहन रणसिंग, सागर रणसिंग, मंगेश मसके, शशांक पिंगुळकर, विजय कांबळी, रुपेश कानडे, पप्या तवटे, विजय दळवी, ममता राऊळ, साधना माड्ये, अश्विनी कांबळी, सोनाक्षी गावडे, राजवीर पाटील भाजप कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजी खासदार नीलेश राणे म्हणाले विकास कुडाळकर तुम्ही परत आमच्या कुटुंबात आलात तुमचे स्वागत आहे गेल्या अडीच वर्षात तुम्ही तिकडे कोरोना कालावधित गेलात आमच्या कुटुंबातील घटक गेल्याने त्यावेळी आम्हाला धक्का बसला. मात्र आता आलात पुन्हा तिकडे जाऊ नका कोरोना लावून घेऊ नका असे सूचित करून तुम्हाला अभिप्रेत असणारा पिंगुळी गावाचा सर्वागीण विकास आम्ही करणार आहोत. तुम्ही केलेल्या प्रवेशाबाबत तुमचा पक्षात मान सन्मान निश्चितच होणार आहे. माझी व येथील स्थानिक आमदार वैभव नाईक आमच्यात दुष्मनी अजिबात नाही. आमचा लढा आहे तो केवळ गेले नऊ वर्षात या आमदारांने लक्षवेधी काम केले नाही सत्ता असताना एकही प्रकल्प आणला नाही आता सत्ता नसताना काय विकासग